नवी दिल्ली, : श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाली आहे, त्यामुळे तो आता आयपीएल खेळू शकणार की नाही याबाबत संभ्रम आहे. पण श्रेयसच्या जागी आता दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला नवा कर्णधार निवडावा लागणार आहे. या कर्णधाराची निवड कधी आणि कशी होणार आहे, पाहा... दिल्लीच्या संघाकडे कर्णधारपदासाठी आता बरेच पर्याय आहेत. यामध्ये अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, स्टीव्हन स्मिथ आणि आर. अश्विन यांचा नावाचा समावेश आहे. पण या पाच जणांपैकी कोणाला कर्णधारपद करायचे, याचा निर्णय आता दिल्लीच्या संघाला घ्यावा लागणार आहे. दिल्लीच्या कर्णधाराची कशी होणार निवड... दिल्लीच्या संघाचे किरण कुमार गांधी आणि पार्थ जिंदाल हे दोघेही मालक आहे. संघाचा कर्णधार निवडताना हे दोघेही मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांच्याशी चर्चा करणार आहे. पॉन्टिंगशी चर्चा केल्यानंतरच दिल्लीच्या कर्णधारपदाचा निर्णय घेण्यात येणार आहे. दिल्लीचा कर्णधार निवडताना बऱ्याच गोष्टी पाहिल्या जाणार आहेत. यामध्ये कर्णधारपदाचा अनुभव ही महत्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर दिल्लीचा एखादा खेळाडू कर्णधारपदी विराजमान होऊ शकतो का, ही शक्यताही तपासली जाणार आहे. त्यामुळे कर्णधाराची निवड करमे हे दिल्लीसाठी सोपे काम नसेल. अनुभवाचा विचार केला तर अजिंक्य रहाणेचे पारडे हे कर्णधारपदासाठी जड असल्याचे म्हटले जात आहे. पण जर दिल्लीचाच कर्णधार करायला असेल तर रिषभ पंतला यावेळी संधी मिळू शकते. कधी होणार दिल्लीच्या कर्णधाराची निवड...दिल्लीच्या कर्णधाराची निवड कधी होणार, याची उत्सुकता आता सर्वांनाच आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस दिल्लीच्या कर्णधाराची निवड होऊ शकते, असे सध्याच्या घडीला म्हटले जात आहे. याचाच अर्थ येत्या पाच दिवसांमध्ये दिल्लीचा नवीन कर्णधार कोण असेल, हे सर्वांना कळणार आहे. कारण यावर्षी आयपीएलला ९ एप्रिलला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी प्रत्येक संघातील खेळाडूला क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. त्याचबरोबर सराव करणयापूर्वी जर कर्णधार निवडण्यात आला तर ते संघासाठी चांगले असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3snwlCO
No comments:
Post a Comment