मुंबई : महेंद्रिसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघामध्ये एका युवा गोलंदाजाचे आगमन झाले आहे. फजलहक फारुखी, असे या युवा वेगवान गोलंदाजाचे नाव आहे. पण हा गोलंदाज आहे तरी कोण आणि तो कुठल्या देशाकडून किती सामने खेळला आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता आता चाहत्यांना आहे. फजलहक फारुखी हा अफगाणिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज आहे. चेन्नईच्या संघाबरोबर सराव करण्यासाठी तो बुधवारी मुंबईत दाखल झाला आहे. अफगाणिस्तानकडून फारुखीने आतापर्यंत फक्त एकच ट्वेन्टी-२० सामना खेळला आहे. त्यावरुन चेन्नईच्या संघात त्याची निवड करण्यात आली आहे. फारुखी झिम्बाब्वेबरोबर आपला एकमेव ट्वेन्टी-२० सामना खेळला आहे. या सामन्यात त्याने २७ धावा देत एक बळी मिळवला होता. त्याचबरोबर आतापर्यंत १२ प्रथम श्रेणी सामन्यांचा त्याला अनुभव आहे. फारुखी हा चेन्नईच्या संघातील नेट बॉलर आहे. चेन्नईच्या फलंदाजांना चांगला सराव मिळावा, यासाठी फारुखीला चेन्नईच्या संघाने भारतामध्ये बोलावून घेतले आहे. फारुखीबरोबरच दक्षिण आफ्रिकेचा हार्दुस विलजॉन हा देखील चेन्नई सुपर किंग्ससाठी नेट बॉलर म्हणून काम करणार आहे. महेंद्रसिंग धोनीने काल (बुधवारी) आपल्या संघाची नवीन जर्सी लाँच केली. यावेळी कोहलीचा एक खास व्हिडीओ संघाने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस पडला असून तो चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. चेन्नईच्या या नवीन जर्सीच्या माध्यमातून भारतीय सेनादनालाही सलाम करण्यात आला आहे. या जर्सीच्या खांद्याची डिझाइन बदलण्यात आली आहे. भारताच्या आर्मीचा जसा गणवेश असतो, तसा रंग यावेळी जर्सीच्या खांद्याला देण्यात आला असून या माध्यमातून भारतीय सेनादलाला कुर्निसात करण्याचा एक प्रयत्न चेन्नईच्या संघाने केल्याचे पाहायला मिळते आहे. युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. कारण आयपीएलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच चेन्नईचा संघ सर्वात पहिल्यांदाच स्पर्धेच्या बाहेर गेला होता. त्याचबरोबर संघ गुणतालिकेत तळालाही होता. त्यामुळे चेन्नईचे चाहते निराश झाले होते. पण या मोसमात धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ काय कमाल करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्यामुळे चेन्नईच्या संघातील बदल किती महत्वाचे ठरतात, हेदेखील पाहावे लागणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NPcptx
No comments:
Post a Comment