पुणे, : पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संघाबरोबर खास सेलिब्रेशन केल्याचे आता समोर आले आहे. शास्त्री यांचा सेलिब्रेशनचा फोटो आता चांगलाच व्हायरल झाला आहे. सामना संपल्यावर दुसऱ्या दिवशी सर्व संघातील खेळाडूंबरोबर शास्त्री यांनी खास सेलिब्रेशन केले. शास्त्री यावेळी संघाबरोबर चांगलेच आनंदात असलेले पाहायला मिळाले. शास्त्री यांच्याबरोबर कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्माही एकत्र होते. दुपारच्या जेवण्याच्यावेळी शास्त्री यांनी हे सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. भारताच्या या विजयात युवा खेळाडूंनी मोलाची कामगिरी केली होती. आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या प्रसिध कृष्णाने यावेळी चार विकेट्स मिळवत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. शार्दुल ठाकूरने यावेळी तीन तर भुवनेश्वर कुमारने दोन बळी मिळवले होते. सलामीवीर शिखर धवनने यावेळी ९८ धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. त्याचबरोबर आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या कृणाल पंड्यानेही तुफानी फटकेबाजी करत अर्धशतक साकारले होते. कृणालने जेव्हा आपले अर्धशतक पूर्ण केले तेव्हा आकाशाकडे पाहत तो रडायला लागला. त्यावेळी कृणालचा भाऊ हार्दिकही भावुक झाल्याचे पाहायला मिळाले होते. या सामन्यात कृणालने ३१ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ५८ धावांची खेळी साकारली. कृणाल आणि हार्दिक या सामन्यात कसे भावुक झाले होते, त्याचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. इंग्लंडचा जलद गोलंदाज मार्क वुडचा चेंडू रोहितच्या हाताला लागला होता. रोहितला लागलेला चेंडू हा १४८ किलोमीटरच्या वेगाने टाकला होता. तर इंग्लंडच्या डावात जॉनी बेयरस्टोने मारलेला चेंडू रोखण्याचा प्रयत्न करताना श्रेयसला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. भारतीय संघातील हे दोन्ही खेळाडू दुसरा एकदिवसीय सामना आता खेळू शकणार नाहीत त्यामुळे संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यासाठी संघात कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vTXfEH
No comments:
Post a Comment