मुंबई : भारतीय गोलंदाजीची जोरदार धुलाई करणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूला आता आयपीएलची लॉटरी लागू शकते. कारण सध्याच्या घडीला सनरायझर्स हैदराबादच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता हैदराबादचा संघ इंग्लंडच्या या फलंदाजाला आपल्या संघात घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. हैदराबादचा खेळाडू मिचेल मार्श हा अष्टपैलू खेळाडू आता आयपीएल खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. करोनामुळे आयपीएल खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना बायो-बबलमध्ये राहावे लागणार आहे. यासाठी मार्श तयार नसून त्याने आता यावर्षी आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता त्याच्या जागी इंग्लंडचा धडाकेबाज सलामीवीर संघात येऊ शकतो, असे म्हटले जात आहे. भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-२० आणि वनडे मालिकेत जेसन रॉयने धडाकेबाज फलंदाजी केली होती. पण त्याला आयपीएलमध्ये आतापर्यंत कोणत्याही संघाने स्थान दिलेले नाही. त्यामुळे आता मार्शच्या जागी हैदराबादच्या संघात जेसनचा समावेश होऊ शकतो, असे सध्याच्या घडीला तरी समजत आहे. पण ही प्रक्रीया हैदराबादला काही दिवसांमध्येच करावी लागणार आहे. कारण ही प्रक्रीया जेवढी लवकर होईल, तेवढ्या लवकर रॉय हा संघात दाखल होऊ शकतो. करोनामुळे आता आयपीएल खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडूला बायो-बबलमध्ये यावे लागणार आहे. पण त्यापूर्वी प्रत्येक खेळाडूला सात दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. या क्वारंटाइनच्या काळात खेळाडूंच्या करोना चाचण्याही घेण्यात येणार आहेत. या चाचण्यांमध्ये निगेटीव्ह आल्यावरच खेळाडूला आयीएलमध्ये खेळता येणार याहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3u7F5gW
No comments:
Post a Comment