पुणे : करोना व्हायरसमुळे सर्व खेळाडूंना जैव सुरक्षित वातावरणात रहावे लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्व खेळाडू बायो बबलमध्ये राहत असून त्यांना नियमीतपणे करोना टेस्ट करावी लागत आहे. वाचा- भारतीय क्रिकेटपटू गेल्या वर्षी आयपीएलपासून बायो बबलमध्ये राहत आहेत. या काळात नियमानुसार प्रत्येक सामन्याआधी त्यांना करोना चाचणी करावी लागते. वारंवार होणाऱ्या करोना चाचणीमुळे खेळाडूंना त्रास होतो. आधीच जैव सुरक्षित वातावरणात रहावे लागते. बाहेर फिरता येत नाही. त्याच करोनाची करावी लागणारी चाचणी यामुळे खेळाडू जर वैतागले नाही तरच नवल. अशीच अवस्था भारतीय संघातील सलामीवीर हिटमॅन रोहित शर्माची झाली. वाचा- इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघात सध्या वनडे मालिका सुरू आहे. दुसऱ्या वनडे सामन्याआधी भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंची करोना चाचणी झाली. या चाचणीसाठी रोहित शर्माची टेस्ट सुरू असताना विकेटकिपर ऋषभ पंतने रोहितचा व्हिडिओ शुट केला. टेस्टसाठी नमुने घेतल्यानंतर पंतने त्याला विचारले कसा आहेस भावा. त्यावर रोहितने गंमतीने मधले बोट दाखवले. वाचा- वाचा- इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडेत रोहित शर्माला फलंदाजी करताना दुखापत झाली होती. इंग्लंडचा जलद गोलंदाज मार्क वुडचा चेंडू रोहितच्या हाताला लागला होता. त्यामुळे रोहित दुसऱ्या वनडेत खेळू शकणार नाही. पुण्यात झालेल्या पहिल्या वनडेत भारताने ३१७ धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडचा डाव २५१ धावांवर संपुष्ठात आला. भारताने या सामन्यात ६६ धावांनी विजय मिळून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघातील दुसरा वनडे सामना २६ मार्च रोजी होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39aSxZu
No comments:
Post a Comment