Ads

Wednesday, March 24, 2021

हिटमॅन रोहित दुसऱ्या वनडेला मुकणार; भारतीय संघात होणार ३ बदल

पुणे : इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यावेळीच भारतीय संघाताल दोन झटके बसले होते. फलंदाजी करताना रोहित शर्माला दुखापत झाली होती. तर क्षेत्ररक्षणावेळी श्रेयस अय्यरच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. या दोन्ही खेळाडूंच्या दुखापतीबाबत भारतीय क्रिकेट बोर्डाने अपडेट दिले आहेत. वाचा- दुखापतीमुळे () दुसऱ्या वनडेत खेळणार नाही. तर श्रेयस अय्यर संपूर्ण मालिकेतच खेळू शकणार नाही असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. श्रेयसची दुखापत गंभीर असून तो कदाचित आयपीएलच्या पहिल्या सत्रात खेळू शकणार नाही असे कळते. वाचा- पहिल्या सामन्यात फलंदाजी करताना इंग्लंडचा जलद गोलंदाज मार्क वुडचा चेंडू रोहितच्या हाताला लागला होता. रोहितला लागलेला चेंडू हा १४८ किलोमीटरच्या वेगाने टाकला होता. तर इंग्लंडच्या डावात जॉनी बेयरस्टोने मारलेला चेंडू रोखण्याचा प्रयत्न करताना श्रेयसला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. भारतीय संघातील हे दोन्ही खेळाडू खेळू शकणार नाहीत त्यामुळे संघाला मोठा धक्का बसला आहे. वाचा- दुसऱ्या वनडेत होऊ शकतात हे ३ बदल रोहित आणि श्रेयस संघात नसल्याने दुसऱ्या वनडेतील पहिली बदल म्हणजे ऋषभ पंतला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यात त्याने शानदार कामगिरी केली आहे. तरी देखील पहिल्या वनडेत त्याच्या ऐवजी राहुलकडे विकेटकिपर म्हणून जबाबदीर दिली होती. राहुलने टी-२०तील खराब कामगिरीनंतर पहिल्या वनडेत ४३ चेंडूत ६२ धावा केल्या. त्यामुळे आता रोहितच्या गैरहजेरीत राहुलला शिखर धवन सोबत सलामीला पाठवले जाऊ शकते. वाचा- केएल राहुलने सलामीला फलंदाजी केली तर पाचव्या स्थानावर सूर्यकुमार यादवला संधी दिली जाईल. यादवने टी-२० मालिकेत धमाकेदार फलंदाजी केली होती. आता दुसऱ्या सामन्यात त्याला वनडेत पदार्पणाची संधी मिळू शकते. वाचा- जर राहुलला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्याचे ठरवले तर सलामीवीर म्हणून संघात शुभमन गिलला संधी दिली जाऊ शकते. या परिस्थितीत गिल आणि शिखर ही जोडी सलामीला दिसू शकेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rhHDXW

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...