मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू () याला करोना व्हायरसची लागण झाली आहे. सचिनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून स्वत:ला करोना झाल्याची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये खेळला होता. या स्पर्धेत सचिनच्या नेतृत्वाखाली भारतीय संंघाने अंतिम सामन्यात श्रीलंकाचा पराभव करत विजेतेपद मिळवले होते. वाचा- करोना व्हायरसपासून बचावासाठी मी सर्व खबरदारी घेत होतो. या व्हायरसची काही लक्षणे जाणवल्यानंतर मी चाचणी केली. त्याच रिपोर्ट आला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. घरातील अन्य सदस्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे सचिनने पोस्टमध्ये म्हटले आहे. मी स्वत:ला घरी होम क्वारंटाइन करून घेतले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी योग्य अशी काळजी घेत आहे. वाचा- सचिनने या पोस्टमध्ये डॉक्टर आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. पोस्टच्या अखेरमध्ये त्याने सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. रोड सेफ्टी मालिकेत सचिन शिवाय विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, ब्रायन लारा, केव्हिन पिटरसन, सनथ जयसूर्या, तिलकरत्ने दिलशान आदी दिग्गज खेळाडू खेळले होते. सचिनने या स्पर्धेतील सात सामन्यात २२३ धावा केल्या होत्या. ६५ ही त्याची सर्वोच्च खेळी होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tT6G5e
No comments:
Post a Comment