![](https://maharashtratimes.com/photo/81707484/photo-81707484.jpg)
पुणे, : दुसरा एकदिवसीय सामना सुरु असतानाच इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सकडून एक मोठी चुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर मैदानातील पंचांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. क्रिकेटच्या नियमांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बदल झाले आहेत. करोनानंतर क्रिकेटचे नियम बदलण्यात आले आहेत आणि जो नियम मोडेल त्याच्यावर कारवाई करण्यासाठी मैदानावरील पंचांना काही अधिकारही देण्यात आले आहेत. त्यानुसारच पंचांनी स्टोक्सवर ही कारवाई केली आहे. नेमकं घडलं तरी काय... ही गोष्ट घडली ती चौथ्या षटकामध्ये. त्यावेळी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रिस टॉपले हा गोलंदाजी करत होता. या चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूचा सामना शिखर धवन करत होता. त्यावेळी हा चेंडू धवनच्या बॅटला लागला आणि स्लिपमध्ये गेला, त्यावेळी एकही धाव शिखरला काढता आली नाही. त्यावेळी स्लिपमध्ये बेन स्टोक्स उभा होता. त्यावेळी स्टोक्सने हा चेंडू उचलला. चेंडूला चकाकी देण्यासाठी स्टोक्सने चेंडू हातामध्ये घेतला आणि त्याला थुंकी लागली. त्यावेळी मैदानावरील पंच वीरेंद्र शर्मा यांनी ही गोष्ट पाहिली. करोनानंतर चेंडूला चकाकी देण्यासाठी थुंकीचा वापर करता येऊ शकत नाही, असा नियम बनवण्यात आला आहे. त्यामुळे वीरेंद्र शर्मा यांनी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला बोलावले आणि स्टोक्सला यावेळी सक्त ताकिद दिली. त्यानंतर नियमांनुसार चेंडूला सॅनिटाइझ करण्यात आले आणि पुन्हा एकदा सामना सुरु करण्यात आला. या चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर शिखर धवनला टॉपलेने बाद केले आणि स्लीपमध्ये उभ्या असलेल्या स्टोक्सनेच हा झेल पकडला. त्यामुळे शिखर धवनला या सामन्यात फक्त चारच धावा करता आल्या. आयसीसीचा नियम काय सांगतो...करोनानंतर क्रिकेटच्या नियमांमध्ये आयसीसीने बदल केले आहेत. त्यानुसार चेंडूला थुंकी लावता येणार नाही. जर एखादा खेळाडू तसे करत असेल तर त्याला पंच दोनवेळा ताकिद देऊ शकतात. पण त्यानंतरही जर खेळाडूने ही गोष्ट ऐकली नाही तर त्याला दंड ठोठावला जाऊ शकतो. त्याचबरोबर यावेळी फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावांचा बोनसही दिला जातो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cqVyHb
No comments:
Post a Comment