पुणे: भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरी आणि अखेरची मॅच सुरू आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताने इंग्लंडला ३३० धावांचे लक्ष्य दिले आहे. वाचा- ... तिसऱ्या वनडेत विराट कोहलीने कर्णधार म्हणून एका खास यादीत स्थान मिळवले. इंग्लंडविरुद्धची तिसरी वनडे विराट कोहलीची कर्णधार म्हणून २००वी वनडे ठरले. भारताकडून २०० किंवा त्याच्या पेक्षा अधिक सामन्यात संघाचे नेतृत्व करणारा विराट हा तिसरा खेळाडू आहे. याआधी धोनी आणि मोहम्मद अझरूद्दीन यांनी अशी कामगिरी केली. वाचा- भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्र सिंह धोनीने सर्वाधिक ३३२ सामन्यात नेतृत्व केले. यापैकी त्याने १७८ सामन्यात विजय तर १२० सामन्यात पराभव स्विकारला. तर मोहम्मद अझरुद्दीनने २२१ सामन्यात नेतृत्व करताना १०४ सामन्यात विजय मिळून दिला. वाचा- विराटच्या नेतृत्वाचा विचार करता त्याने १९९ सामन्यापैकी १२७ मध्ये विजय मिळून दिला तर ५५ सामन्यात पराभव झालाय. विराट जगातील आठवा कर्णधार आहे ज्याने २०० किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यात नेतृत्व केले आहे. वर्ल्ड क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग आहे. त्याने ३२४ सामन्यात नेतृत्व केले. तर न्यूझीलंडच्या स्टीफन फ्लेमिंगने ३०३ सामन्यात नेतृत्व केले आहे. वाचा- दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथने २८६, एलन बॉर्डन यांनी २७१, अर्जुन रणतुंगाने २४९ सामन्यात नेतृत्व केले आहे. भारताकडून सौरव गांगुलीने १९६ सामन्यात नेतृत्व करत ९७ मध्ये विजय तर ७९ मध्ये पराभव स्विकारला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39nJQLh
No comments:
Post a Comment