
ख्राइस्टचर्च: भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-२० मालिकेत सॉफ्ट सिग्नलने बराच गोंधळ घातला होता. चौथ्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांचे घेतलेल्या कॅच वादग्रस्त ठरले होते. मैदानावरील अंपायरने बाद दिल्यानंतर तिसऱ्या अंपायरने कॅच बाबत शंका असताना देखील त्यांना बाद दिले होते. आता आणखी एका सामन्यात सॉफ्ट सिग्नलचा नियम चर्चेत आला आहे. वाचा- न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात काइली जेमीसनने एक कॅच पकडला जो मैदानावरील अंपायरने सॉफ्ट सिग्नल बाद दिले. त्यानंतर निर्णय तिसऱ्या अंपायरकडे सोपवला. तिसऱ्या अंपायरने मैदानावरील अंपायरचा निर्णय बदलला आणि फलंदाजाला नाबाद ठरवले. वाचा- बांगलादेशच्या १५व्या षटकात ही घटना घडली. कर्णधार तमीम इकबालने जेमीसनच्या फुल चेंडूवर गोलंदाजाच्या दिशने ड्राइव्ह मारला. फॉलो थ्रू मध्ये जेमीसनने खाली झुकला आणि शानदार कॅच घेता. जेमीसनने कॅच स्पष्टपणे घेतला होता. पण जमीनीवर पडताना चेंडू असलेला हात जमीनावर लागला होता का याबाबत स्पष्टता नव्हती. तिसऱ्या अंपायरने कॅमेरा झूम करून पाहिल्यानंतर चेंडू जमीनीला स्पर्श केल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी मैदानावरील अंपायरचा निर्णय बदलला. वाचा- ... तमीम इकबाल ३४ धावांवर असताना ही घटना घडली. त्यानंतर त्याने १०८ चेंडूत ७८ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तमीम इकबालचे हे ५०वे अर्धशतक ठरले. त्याला जिमी निशमने धावबाद केले. वाचा- तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड १-०ने आघाडीवर आहे. पहिली मॅच त्यांनी ८ विकेटनी जिंकली होती. भारत-इंग्लंड मालिकेत झाला होता वाद भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेतील चौथ्या लढतीत सॉफ्ट सिग्नलमुळे बराच वाद झाला होता. ५७ धावा करणाऱ्या सूर्यकुमारचा कॅच फाइन लेगवर डेव्हिड मलानने घेतला होता. तेव्हा देखील कॅच घेताना चेंडू जमीनीवर लागला होता. पण तिसऱ्या अंपायरने मैदानावरील अंपायरचा निर्णय कायम ठेवला. त्याच सामन्यात वॉशिंग्टन सुंदरच्या बाबत देखील असेच घडले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lJiWCG
No comments:
Post a Comment