पुणे, : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून (मंगळवार) सुरुवात होणार आहे. यावेळी पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ नेमका कसा असेल, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघात जास्त प्रयोग केले जाणार नाहीत. पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाची सलीमीची जबाबदारी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने तसे जाहीरही केले आहे. त्याचबरोबर तिसऱ्या स्थानावर विराट कोहली फलंदाजीला येऊ शकतो. त्याचबरोबर चौथ्या स्थानावर लोकेश राहुलला संधी मिळू शकते. भारताच्या मधल्या फळीत विराट आणि राहुलबरोबरच श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांना संधी मिळू शकते. सध्याच्या घडीला सूर्यकुमार यादव हा चांगल्या फॉर्मात आहे. पण सध्याच्या घडीला पहिल्या सामन्यात तरी त्याला संधी मिळू शकत नाही, असेच चित्र आहे. कारण मधल्या फळीतील एखादा फलंदाज अपयशी ठरत असेल तर त्याच्या जागी सूर्यकुमारला संघात स्थान मिळू शकते. भारताच्या गोलंदाजीमध्ये मात्र काही बदल नक्कीच होऊ शकतात, असे चित्र सध्या दिसत आहे. भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा यावेळी शार्दुल ठाकूर आणि टी. नटराजनवर असू शकते. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला यावेळी संधी मिळते की नाही, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. फिरकी गोलंदाजांमध्येही यावेळी चांगली विविधता पाहायला मिळू शकते. फिरकी गोलंदाजीमध्ये युजवेंद्र चहल ट्वेन्टी-२० मालिकेमध्ये चांगलाच महागडा ठरला होता. त्याच्या चार षटकरांमध्ये सरासरी ४० धावा फटकावलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. त्यामुळे आता वनडे संघाचा विचार करताना युजवेंद्र चहलचा विचार नक्कीच केला जाऊ शकतो. चहलबरोबर यावेळी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळते का, हे पाहणेही उत्सुकतेचे असेल. कारण गेल्या २-३ सामन्यांमध्ये सुंदरच्या गोलंदाजीवरही जास्त धावा गेल्या होत्या. पण चहलपेक्षा त्याची गोलंदाजी चांगली झाली होती. त्यामुळे या दोघांना संधी मिळणार की या दोघांपैकी एकाला संधी मिळणार, हे पाहावे लागले. या संघात कृणाल पंड्यासारख्या अष्टपैलू खेळाडूचीही संभाव्य संघात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्याला जर संघात संधी दिली तर संघाचे समतोल योग्य राखता येऊ शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2OXYqlF
No comments:
Post a Comment