पुणे, : भारताचा कर्णधार विराट कोहलीवर आता टांगती तलवार आहे. कारण कोहलीवर आता दोन सामन्यांची बंदी येऊ शकते, असे म्हटले जात आहे. कारण आयसीसीच्या नियमानुसार कोहली दोषी ठरलेला आहे. आयसीसीचा हा नियम आहे तरी काय आणि कोहलीने नेमकी कोणती मोठी चुक केली आहे, पाहा... आयसीसीचा नियम काय सांगतो...आयसीसीने खेळाडूंसाठी काही नियम बनवले आहेत आणि त्याचे पालन न केल्यास खेळाडूवर निलंबनाची कारवाई करण्यात येऊ शकते. आयसीसीच्या नियमानुसार जर एखाद्या खेळाडूच्या खात्यात २४ महिन्यांमध्ये जर ४ किंवा त्यापेक्षा जास्त डिमेरीट गुण जमा झाला तर त्याचे दोन सामन्यांसाठी निलंबन केले जाते. सध्याच्या घडीला कोहलीच्या खात्यामध्ये दोन डिमेरीट गुण जमा आहेत. त्याचबरोबर ट्वेन्टी-२० मालिकेत कोहलीकडून मोठी चुक झाली असून त्यामध्ये जर तो दोषी आढळला तर त्याला दोन डिमेरिट गुण देता येतील आणि हे दोन डिमेरीट गुण दिल्यानंतर कोहलीवर दोन सामन्यांच्या निलंबनाची कारवाई होऊ शकते. कोहलीकडून नेमकी कोणती मोठी चुक झाली पाहा... भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये यापूर्वी कसोटी मालिका झाली होती. या मालिकेत कोहली मैदानातील पंचांबरोबर हुज्जत घालत असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी कोहलीला दोन डिमेरीट गुण देण्यात आले होते. त्यानंतर पाचव्या ट्वेन्टी-२० सामन्यातही कोहलीकडून मोठी चुक घडल्याचे पाहायला मिळाले. कारण या सामन्यात जेव्हा जोस बटलर बाद झाला तेव्हा कोहलीने त्याच्याबाबत असभ्य भाषा वापरली आणि काही इशारेही केले. त्याचबरोबर कोहलीने यावेळी बटलरला चिथावले, असेही म्हटले जात आहे. हा आयसीसीच्या नियमांनुसार गुन्हा आहे आणि त्यासाठी कोहलीला दोषी ठरवले जाऊ शकते. कोहलीला जर याप्रकरणी दोषी ठरवले गेले, तर त्याला दोन डिमेरीट गुण दिले जातील, म्हणजेच कोहलीच्या खात्यामध्ये एकूण चार डिमेरीट गुण जमा होतील. त्यामुळे आयसीसीच्या नियमांनुसार कोहलीवर दोन सामन्यांचे निलंबन येऊ शकते. पण आयसीसी चौकशी करुन हा निर्णय घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cUCnEr
No comments:
Post a Comment