पुणे: इंग्लविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या वनडेत भारताचा कर्णधार () याने एक खास यादीत स्थान मिळवले आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडेत भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. भारताने मालिकेतील पहिली लढत जिंकून आघाडी घेतली असून दुसऱ्या लढतीत विजय मिळवून मालिका जिंकण्याचे टीम इंडियाचे लक्ष्य असेल. वाचा- विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत १० हजार धावांचा टप्पा पार केला. या क्रमांकावर फलंदाजीला येत १० हजार धावा करणारा तो जगातील फक्त दुसरा फलंदाज आहे. विराट कोहलीच्या आधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने क्रमांक तीनवर येत अशी कामगिरी केली होती. वाचा- पॉन्टिंगने वनडेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १२ हजार ६६२ धावा केल्या आहे. याबाबत विराटने कुमार संगकारा, जॅक कॉलिस, केन विलियमसन यांना मागे टाकले. संगकाराने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत २३८ डावात ९ हजार ७४७ धावा केल्या. कॅलिसने २०० डावात ७ हजार ७७४ तर विलियमसनने ११७ डावात ५ हजार ४२१ धावा केल्या आहेत. वाचा- इतक नाही तर विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर सर्वात वेगाने १० हजार धावा करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. गेल्या वनडेत विराटने भारतीय मैदानावर सर्वात कमी डावात १० हजार धावांचा टप्पा गाठला होता. रिकी पॉन्टिंगने २१९ डावात घरच्या मैदानावर १० हजार धावा केल्या होत्या. विराटने २१९ डावात हा टप्पा पार केला. दुसऱ्या वनडेत शिखर धवन ४ धावांवर बाद झाला. तर रोहित शर्मा देखील २६ धावाकरून माघारी परतला. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. विराट कोहली ६६ धावांवर बाद झाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3m4OkvL
No comments:
Post a Comment