पुणे: अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत भारताने इंग्लंडचा सात धावांनी पराभव केला आणि मालिका २-१ने जिंकली. या विजयासह भारताने आयसीसी पुरुष क्रिकेट ()च्या गुणतक्त्यात सातवा क्रमांक मिळवला. वाचा- भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत इंग्लंडने दुसऱ्या लढतीत विजय मिळवला होता. त्या विजयासह ते गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर पोहोचले होते. ००० मध्ये इंग्लंडने आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत. त्यापैकी चार मध्ये विजय तर ५ मध्ये त्यांचा पराभव झाला आहे. इंग्लंड ४० गुणांसह आणि ०.४६८ नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाने ६ पैकी ४ विजय आणि दोन पराभवासह ४० गुण आणि + ०.३४७ सह दुसरे स्थान मिळवले आहे. वाचा- भारताने ००० मध्ये आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. त्यापैकी ३ मध्ये विजय तर ३ मध्ये त्यांचा पराभव झालाय. भारताकडे २९ गुण आहेत आणि त्यांचा नेट रनरेट -०.२५२ इतका आहे. आयसीसीने पेनल्टी ओव्हरसाठी भारताचा एक गुण वजा केला आहे. वाचा- या गुणतक्त्यात न्यूझीलंड तिसऱ्या, अफगाणिस्तान चौथ्या, बांगलादेश पाचव्या तर वेस्ट इंडिज सहाव्या क्रमांकावर आहे. भारताने तिसऱ्या लढतीत विजय मिळवून पाकिस्तानला मागे टाकले. पण अद्याप ते बांगलादेश, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्या मागे आहेत. वाचा- काय आहे आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप सुपर लीग २०२३ साली होणाऱ्या आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने ही लीग महत्त्वाची आहे. ही लीग ३० जुलै २०२० पासून सुरू झाली असून जी ३१ मार्च २०२३ पर्यंत होईल. या लीगमधील पहिले सात संघ वर्ल्डकपसाठी पात्र होतील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39rdHTj
No comments:
Post a Comment