पुणे: भारताविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने ३३७ धावांचे लक्ष्य ४४व्या षटकात पार केले. या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. इंग्लंडकडून सलामीवीर जॉनी बेयरस्टोने १२४ धावांची शतकी खेळी केली. या सामन्यातील विजयासह इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी देखील केली. वाचा- काही दिवसांपूर्वी भारताचे माजी कर्णधार यांनी बेयरस्टोला कसोटी मालिकेतील खराब कामगिरीनंतर त्याला या फॉर्मेटमध्ये रुची नसल्याचे वक्तव्य केले होते. आता गावस्करांच्या त्या वक्तव्यावर इंग्लंडच्या सलामीवीरीने त्याच्या स्टाइलमध्ये उत्तर दिले आहे. वाचा- दुसऱ्या वनडेत बेयरस्टोने जेसन रॉयसोबत पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. त्यानंतर बेन स्टोक्ससह १७५ धावाची भागिदारी करून संघाचा विजय निश्चित केला. सामना झाल्यानंतर बेयरस्टोने गावस्करांच्या वक्तव्यावर उत्तर दिले. वाचा- सर्वप्रथम मी स्वत: असे काही ऐकले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याशी चर्चा न करता किंवा संपर्क न करता असे मत कसे काय व्यक्त करू शकतो. कारण माझ्यात आणि त्यांच्यात आतापर्यंत कोणत्याही गोष्टीवर चर्चा झालेली नाही. वाचा- जर तसे काही असेल तर मी इतकच सांगेन की, ते मला कधीही फोन करू शकतात. त्याचे स्वागत आहे. मी कसोटीत चांगली कामगिरी करण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करेन आणि मी कसोटी क्रिकेट अधिक चांगल्या पद्धतीने खेळू शकेन. माझा फोन सुरू आहे. त्याची इच्छा असेल तर ते मला फोन करू शतकात किंवा मेसेज करू शकतात.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fwj0Vt
No comments:
Post a Comment