मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर()ने आज (शनिवारी) पॉझिटिव्ह असल्याचे सोशल मीडियावरून सर्वांना सांगितले. सचिनला करोना (covid-19) व्हायरसची लागण झाल्याचे कळाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी तो लवकर बरा व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्या. अशाच एका माजी क्रिकेटपटूने मात्र असे काही ट्विट केले ज्यावर चाहत्यांसोबत भारतीय माजी खेळाडू देखील भडकले. वाचा- इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ()ने सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावरून करोना झाल्याचे जाहीर केल्यानंतर एक ट्वीट केले. तो म्हणतो, मला कोणी सांगू शकेल का की, करोना पॉझिटिव्ह आहे ही गोष्ट जगाला सांगण्याची काय गरज आहे. वाचा- वाचा- पीटरसनच्या या ट्विटनंतर भारताचा माजी क्रिकेटपटू () भडकला. त्याने पीटरसनला विचारले, हा विचार तुझ्या डोक्यात आजच कसा काय आला? वाचा- युवराज सिंगने दिलेल्या उत्तरानंतर पीटरसनने आणखी एक ट्विट केले. त्यात तो म्हणतो, 'सचिन तेंडुलकरला करोना झाल्याचे आताच कळाले. ओहो, माफ कर सचिन, लवकर बरा हो मित्रा', त्यावर युवराजने देखील मी तुझी चेष्टा करत होतो असे ट्विट केले. या दोन्ही खेळाडूच्या ट्विटवर चाहते देखील प्रतिक्रिया देत आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये सचिन, युवराज आणि पीटरसन हे एकत्र खेळले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3svOnmt
No comments:
Post a Comment