पुणे, : इंग्लंडविरुद्धचा तिसऱ्या सामन्यात भारताची फलंदाजी पाहिल्यावर यावेळी चाहत्यांना अष्टपैलू रवींद्र जडेजाची आठवण आली आहे. जडेजाच्या नावाने यावेळी ट्विटचा पाऊस पडल्याचेही पाहायला मिळाले. आजच्या सामन्यात अष्टपैलू कृणाल पंड्याला मोठी खेळी साकारुन धावसंख्या वाढवण्याची सुवर्णसंधी होती. पण त्यामध्ये कृणाल अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर कृणालपेक्षा चांगली फलंदाजी यावेळी शार्दुल ठाकूरने केल्याचे पाहायला मिळाले. कृणालने यावेळी ३४ चेंडूंमध्ये २५ धावाच करता आल्या. पण शार्दुल ठाकूरने मात्र यावेळी २१ चेंडूंत ३० धावांची खेळी साकारली. त्यामुळे यावेळी जर रवींद्र जडेजा संघात असला असता तर त्याने चांगली फलंदाजी केली असती, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. एका चाहत्याने म्हटले आहे की, सध्याच्या घडीला जडेजापेक्षा कृणाल हा चांगला अष्टपैलू खेळाडू आहे हे बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आतापर्यंत जडेजाला चांगला अनुभव आहे आणि तो चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी चांगला अष्टपैलू हा कृणाल नसून जडेजाच आहे. सध्याच्या घडीला बॅटींग ऑलराऊंडर म्हणून रवींद्र जडेजा हाच भारतीय संघापुढे असलेला चांगला पर्याय आहे. कारण कृणालची फलंदाजी पाहिल्यावर ही गोष्ट आता समोर येत आहे. त्यामुळे कृणालची फलंदाजी पाहून यावेळी जडेजाबद्दलचा आदर अधिक वाढत आहे, असेही काही चाहत्यांनी यावेळी म्हटले आहे. भारतीय संघाला या सामन्यात ३२९ धावा करता आल्या. पण कृणालने जर आक्रमक फलंदाजी केली असती तर भारतीय संघ ३५० पर्यंत सहज पोहोचू शकला असता. पण धावसंख्या वाढण्यात यावेळी कृणालला अपयश आल्याचे पाहायला मिळाले. भारताने या सामन्यात इंग्लंडला ३३० धावांचे आव्हान दिले आहे. भारताला यावेळी शिखर धवनच्या अर्धशतकाच्या जोरावर १०३ धावांची सलामी मिळाली होती. पण त्यानंतर भारताने ५४ धावांमध्ये चार विकेट्स गमावल्या आणि त्यांची ४ बाद १५७ अशी अवस्था झाली होती. त्यावेळी पंतने फलंदाजीला आल्यावर धमाकेदार फलंदाजी केली आणि त्यामुळेच भारताला चांगल्या धावा करता आल्या. पंतला यावेळी हार्दिकची चांगली साथ मिळाली. कारण हार्दिकने यावेळी ६४ धावांची खेळी साकारली. त्यामुळे भारताला पंत आणि हार्दिक यांच्या फलंदाजीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारता येऊ शकली. पण कृणाल मात्र यावेळी अपयशी ठरल्याचेच दिसले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PvMc3L
No comments:
Post a Comment