पुणे, : इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकांमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली बाहेर संघाबाहेर होऊ शकतो. विराट कोहलीचे मैदामधील वागणे, यासाठी सर्वात मोठे कारण ठरू शकते. त्यामुळे आता विराटवर ही कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. विराट कोहली हा मैदानात जास्त आक्रमक असतो, त्यामुळे त्याच्या हातून बऱ्याच चुका घडतात. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये विराट कोहलीकडून बऱ्याच चुका झाल्या आहेत आणि या चुकांमुळेच त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी घालण्याची कारवाई होऊ शकते. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीने पंचांबरोबर वाद घातला होता. क्रिकेटसारख्या सभ्य गृहस्थांच्या खेळाला हे शोभण्यासारखे नव्हते. त्यामुळे विराट कोहलीवर आयसीसीने कारवाई केली होती. यावेळी कोहलीला दोन डिमेरीट गुण देण्यात आले होते. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतही कोहलीकडून मोठी चुक झाल्याचे पाहायला मिळाले. पाचव्या आणि निर्णायक ट्वेन्टी-२० सामन्यात कोहली पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर बाद झाला तेव्हा विराट कोहली आणि त्याच्यामध्ये वाद झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बटलर बाद झाल्यावर पॅव्हेलियनकडे जाताना तो विराटला काही तरी बडबडला. तेव्हा विराटने देखील त्याला उत्तर दिले. दोन्ही खेळाडू एकमेंकांकडे चालत आले. विराट अधिक आक्रमकपणे उत्तर देत बटलरच्या दिशेने जात होता. यावेळी खेळाडूबाबत असभ्य भाषा वापरणे आणि बाद झाल्यावर त्याला चिथावणे किंवा त्याच्याबाबत काही इशारे करणे हा गुन्हा समजला जातो. त्यामुळे विराटला पुन्हा दोन डेमिरीट गुण दिले जाऊ शकतात. त्यामुळे जर विराटच्या खात्यामध्ये दोन डिमेरीट गुण जमा झाला तर त्याला इंग्लंडविरुद्धच्या दोन वनडे सामन्यांना मुकावे लागू शकते. त्यामुळे आयसीसी आता या प्रकरणाच्या चौकशीनंतर नेमका कोणता निर्णय घेते आणि याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यासाठी आयसीसी सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांच्याशी चर्चा करु शकते आणि मैदानात नेमके काय झाले, याची माहिती घेऊन विराटवर कारवाई करू शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eXQUSC
No comments:
Post a Comment