पुणे: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारतीय संघाने सात धावांनी विजय मिळन मालिका देखील जिंकली. या सामन्यात दोन्ही संघांनी शानदार कामगिरी केली. त्यामुळेच सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. भारताने इंग्लंडला ३३० धावांचे लक्ष्य दिले होते. पण त्यांना ३२२ धावा करता आल्या. वाचा- सामना झाल्यानंतर जेव्हा पुरस्कार सोहळ्यात सामनावीर पुरस्कार शार्दुल ठाकूर आणि मालिकावीर पुरस्कार भुवनेश्वर कुमार याला न मिळाल्याबद्दल भारताचा कर्णधार याने नाराजी व्यक्त केली. अखेरच्या लढतीत शार्दुलने ३० धावा केल्या. तर गोलंदाजीत चार विकेट देखील घेतल्या. भुवनेश्वरने संपूर्ण मालिकेत शानदार गोलंदाजी केली. वाचा- इंग्लंडकडून तिसऱ्या वनडेत नाबाद ९५ धावा करणाऱ्या सॅम करनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. तर जॉनी बेयरस्टोला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. वाचा- जेव्हा दोन आघाडीचे संघ एकमेकांविरुद्ध खेळतात तेव्हा लढती रोमांचक होतात. सॅमने चुरशीची फलंदाजी केली. भारताच्या गोलंदाजांनी विकेट घेतल्या. हार्दिक आणि नटराजन यांनी चांगली गोलंदाजी केली. आम्ही काही कॅच सोडले जे निराशजनक होते. पण अखेर विजय मिळवला. मला आश्चर्य वाटले की शार्दुलला सामनावीर आणि भुवीला मालिकावीर पुरस्कार दिला नाही. सर्वाधिक श्रेय गोलंदाजांचे आहे. त्यांनी अवघड परिस्थितीत चांगली गोलंदाजी केली, असे विराट म्हणाला. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने देखील यासंदर्भात ट्विट केले आहे. त्याने भुवनेश्वर कुमारला मालिकावीर पुरस्कार का नाही असा सवाल केला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dcimJP
No comments:
Post a Comment