नवी दिल्ली, : श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाली असून तो आयपीएलमधील काही सामने खेळू शकणार नाही. त्यामुळे आता दिल्ली कॅपिटल्सची चिंता वाढली आहे. कारण श्रेयस नसताना दिल्लीच्या संघाने नेतृत्व कोण करणार, हा प्रश्न आता त्यांच्यापुढे असेल. श्रेयस नसताना दिल्लीचे कर्णधारपद कोणाकडे द्यायचे, याचा विचार आता संघ व्यवस्थापनाला पडला आहे. पण यासाठी काही पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वात चांगला पर्याय हा अजिंक्य रहाणेचा असू शकतो. कारण अजिंक्यने यापूर्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाचे नेतृत्व केले आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये त्याला भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती आणि त्याने या संधीचे सोने करत इतिहास रचला होता. त्यामुळे सध्याच्या घडीला दिल्लीपुढे अजिंक्य रहाणेचा सर्वोत्तम पर्याय दिसत आहे. जर दिल्लीच्या संघाला युवा कर्णधार असेल तर पृथ्वी शॉ याच्या नावाचा नक्कीच विचार केला जाऊ शकतो. कारण नुकत्याच झालेल्या विजय हजारे करंडकामध्ये पृथ्वीने मुंबईच्या संघाचे नेतृत्व केले होते आणि संघाला विजेतेपदही मिळवून दिले होते. त्याचबरोबर पृथ्वी आता चांगल्या फॉर्ममध्ये आहे. कारण विजय हजारे करंडक स्पर्धेत सर्वाधिक धावा या पृथ्वीच्या नावावर होत्या. त्यामुळे पृथ्वीच्या नावाचीही कर्णधारपदासाठी विचार केला जाऊ शकतो. दिल्लीच्या संघात स्टीव्हन स्मिथला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे संघाच्या नेतृत्वाचा विचार करायचा झाला तर दिल्लीपुढे स्टीव्हन स्मिथचा पर्यायदेखील उपलब्ध असू शकतो. कारण आतापर्यंत स्मिथने आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाचाही त्याला अनुभव आहे. त्यामुळे दिल्लीसाठी एक कर्णधार म्हणून तो एक चांगला पर्याय ठरू शकतो. दिल्लीकडे कर्णधारपदासाठी चौथा पर्याय असू शकतो तो म्हणजे आर. अश्विनचा. अश्विनकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. त्याचबरोबर अश्विनने किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाचे कर्णधारपद भूषवले होते. त्यामुळे अश्विनच्या नावाचा विचारही दिल्लीचा संघ कर्णधारपदासाठी करु शकतो. त्याचबरोबर रिषभ पंत हा एक अजून एक पर्याय दिल्लीकडे असेल. कारण पंत हा दिल्लीचा आहे, त्यामुळे त्याच्या नावाचा विचारही यावेळी केला जाऊ शकतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fbTm86
No comments:
Post a Comment