मुंबई : आयपीएल अजून सुरु झालेली नाही. पण त्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघाला धक्का बसला आहे. कारण मुंबईच्या संघातील एक महत्वाचा खेळाडू काही सामन्यांसाठी संघाबाहेर राहणार असल्याचे आता दिसत आहे. मुंबई इंडियन्सला क्विंटन डीकॉकने चांगली सुरुवात करून दिली आहे आणि संघाचा तो महत्वाचा खेळाडू आहे. सलामीबरोबरच डीकॉक हा यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सांभाळतो. पण यावर्षीच्या आयपीएलच्या काही सामन्यांमध्ये आपल्याला डीकॉक दिसणार नाही. त्यामुळे डीकॉकच्या जागी इशान किशन हा रोहित शर्माबरोबर सलामीला येऊ शकतो. कारण भारतीय संघाकडून खेळताना इशानने सलामीवीराची भूमिका पार पाडली आहे. डीकॉकपुढे नेमकी काय आहे समस्या, पाहा... सध्याच्या घडीला दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेट मालिका सुरु होणार आहे. या दोन्ही देशांमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील तीन सामने २, ४ आणि ७ एप्रिलला होणार आहे. डीकॉक हा दक्षिण आफ्रिकेच्या वनडे संघात आहे. त्यामुळे ७ एप्रिलनंतरच तो आयपीएलसाठी भारतामध्ये रवाना होऊ शकतो. सध्याच्या घडीला करोनामुळे काही नियम बनवण्यात आले आहेत. जर डीकॉकला आयपीएल खेळायचे असेल तर त्याला सात दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. त्यामुळे डीकॉक मुंबई इंडियन्सच्या काही सामन्यांसाठी संघाबाहेर असेल. दक्षिण आफ्रिकेचे नावाजलेले खेळाडू क्विंटन डीकॉक, कागिसो रबाडा, एन्रीच नॉर्तजे, लुंगी एनगिडी आणि डेव्हिड मिलर हे आयपीएलमधील काही सामने खेळू शकणार नाहीत. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये २ एप्रिलपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेमध्ये हे सर्व खेळाडू खेळणार आहे. ही मालिका संपल्यावरही या खेळाडूंना थेट आयपीएलमध्ये खेळता येणार नाही. कारण ही मालिका संपल्यावर ते भारतामध्ये दाखल होतील आणि त्यानंतर त्यांना क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये या खेळाडूंची करोना चाचणीही करण्यात येणार आहे. या चाचणीमध्ये जर ते निगेटीव्ह सापडले तरच त्यांना आयपीएलमध्ये खेळता येणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39umcNq
No comments:
Post a Comment