![](https://maharashtratimes.com/photo/81701977/photo-81701977.jpg)
ख्राइस्टचर्च : न्यूझीलंड आणि बांगलादेश ( ) यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. मालिकेतील अखेरच्या लढतीत न्यूझीलंडकडून डेरिल मिचेल () आणि डेव्हन कॉनवे यांनी शतक झळकावले. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत ५० षटाकत ६ बाद ३१८ धावा केल्या. बदल्यात बांगलादेशचा डाव १५४ धावात संपुष्ठात आला. न्यूझीलंडने ही मालिका ३-०ने जिंकली. तिसऱ्या वनडेत न्यूझीलंडकडून कॉनवेने ११० चेंडूत १२६ धावा केल्या. तर मिचेलने ९२ चेंडूत १०० धावा केल्या. या दोन्ही शतकांमध्ये कॉनवेने सर्वाधिक धावा केल्या असल्यातरी चर्चा झाली ती मिचेल याच्या शतकाची. वाचा- न्यूझीलंडच्या डावात ४८ षटकात मिचेलने ८२ चेंडूत ७१ धावा केल्या होत्या. शिल्लक १२ चेंडूत त्याला शतक करणे थोडे अवघड होते. पण अखेरच्या षटकात नाट्यमयरित्या त्याचे शतक पूर्ण झाले. कॉनवेच्या शतकामुळे न्यूझीलंडने मोठी धावसंख्या उभी केली होती. पण मिचेलच्या शतकाने न्यूझीलंडला ३००च्या पुढे मजल मारता आली. सामन्यात ४८ षटकानंतर मिचेलने ८२ चेंडूत ७१ धावा केल्या होत्या. १२ चेंडूत त्याला २९ धावांची गरज होती. न्यूझीलंडचा डाव संपला तेव्हा त्याने ९२ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह १०० धावा केल्या. अखेरच्या षटकात मिचेलला शतकासाठी १७ धावांची गरज होती. मुस्तफिजुर रहमानच्या पहिल्या ३ चेंडूवर त्याने ३ चौकार मारले. यातील तिसरा चेंडू नो बॉल होता, त्यामुळे तो परत टाकावा लागला. तिसऱ्या चेंडूवर दोन धावा घेत तो शतकाच्या जवळ पोहोचला. चौथ्या चेंडूवर त्याला एकच धाव घेऊ शकला. मिचेल ९८ वर पोहोचला होता. पण तो नॉन स्ट्रायकरच्या दिशेला उभा होता. पाचव्या चेंडूवर मिशेल सॅटनरने ३ धावा घेतल्या आणि डेरिल मिचेल फलंदाजीला आला. अखेरच्या चेंडूवर त्याला शतकासाठी २ धावांची गरज होती मुस्तफिजुरच्या फुल टॉस चेंडूवर त्याने शॉट मारला आणि त्याने २ धावा पूर्ण केल्या. पण यातील एक धाव अंपायरने शॉर्ट दिली. अंपायरने धाव शॉर्ट दिल्याचे लक्षात आल्यानंतर खराब थ्रो झाल्याने त्याने पुन्हा दुसरी धाव पूर्ण केली आणि शतक देखील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vWhzW5
No comments:
Post a Comment