मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरी वनडे उद्या (रविवारी) २८ मार्च रोजी होणार आहे. इंग्लंडने दुसऱ्या वनडेत शानदार विजय मिळवत मालिका १-१ अशी बरोबरीत केली. त्यामुळे अंतिम सामन्याला फानयलचे स्वरुप आले आहे. जो मॅच जिंकले त्याला विजेतेपद मिळेल. वाचा- मालिकेतील पहिली वनडे भारताने जिंकली होती. दुसऱ्या वनडेत इंग्लंडने ३३७ चे लक्ष्य ४४ व्या षटकात पार केले. या सामन्यात भारताची गोलंदाजी अतिशय खराब झाली. सर्वात कळजीचा विषय म्हणजे कुलदीप यादवची गोलंदाजी होय. कुलदीपने १० षटकात ८४ धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. आता भारताचा कर्णधार विराट कोहलीकडे तिसऱ्या वनडेत त्याला बाहेर बसवण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल. वाचा- अखेरच्या वनडेत वॉशिंग्टन सुंदरला अंतिम ११ मध्ये संधी मिळू शकते. सुंदरने २० मालिकेत चांगली गोलंदाजी केली होती. पण सध्या असा एक मुद्दा चर्चेत आला आहे ज्याने विराट कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत. जेव्हापासून महेंद्र सिंह धोनीने निवृत्ती घेतली आहे तेव्हापासून भारतीय क्रिकेट संघात कुलदीप आणि चहर यांच्या फिरकीची जादू दिसली नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली कुलदीपने ४७ सामन्यात ९१ विकेट घेतल्या आहेत. तर धोनीनंतर १६ सामन्यात फक्त १४ विकेट घेता आल्या. चहलच्या बाबत धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर चहलची जादू कमी पडली. धोनी संघात असताना ४६ सामन्यात त्याने ८१ विकेट घेतल्या. तर धोनीनंतर ८ सामन्यात ११ विकेट घेता आल्या. वाचा- धोनीची रणनिती आणि फिरकी सध्या धोनी संघात नसल्याने कुलदीप आणि चहल यांची गोलंदाजी कमकुवत झाल्याची चर्चा सुरू आहे. धोनी नेहमी विकेटच्या मागून या गोलंदाजांना सल्ला देत असे. ज्यावर फलंदाज चुका करत आणि या दोन्ही फिरकीपटूंना विकेट मिळत असे. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cuIlgy
No comments:
Post a Comment