पुणे: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत झालेल्या पराभवानंतर आता मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या मॅचला फायनलचे स्वरुप आले आहे. दोन्ही संघ मालिकेत १-१ अशा बरोबरीत आहेत. दुसऱ्या वनडेत झालेल्या भारताच्या पराभवानंतर आता तिसऱ्या वनडेत संघात बदल होण्याची शक्यता अधिक आहे. भारताने ३३६ धावा करून देखील खराब गोलंदाजीमुळे त्याचे संरक्षण करता आले नव्हते. वाचा- वाचा- भारतीय संघाला जर मालिका जिंकायची असेल तर गोलंदाजी विभागात सुधारणा करावी लागले. ३३६ सारखी मोठी धावसंख्या गोलंदाजांकडून वाचवली जाऊ शकत नसेल तर ही गोष्टी काळजीची आहे. तिसऱ्या वनडेत भारतीय संघात एक मोठा बदल होऊ शकतो. फिरकीपटू कुलदीप यादवला डच्चू मिळण्याची शक्यता अधिक आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही आणि त्याने धावा देखील भरपूर दिल्या. वाचा- वाचा- सलामीची जोडी म्हणून रोहित शर्मा आणि शिखर धवन हीच असेल. तर मधल्या फळीत विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या हेच असतील. विकेटकिपर म्हणून ऋषभ पंतला पसंती दिली जाईल. पहिल्या वनडेत पदार्पणात धमाकेदार फलंदाजी करून एक विकेट घेणारा क्रुणाल पंड्या दुसऱ्या वनडेत तो फार प्रभाव टाकू शकला नसला तरी त्याची जागी पक्की असेल. फिरकीपटूंमध्ये कुलदीपच्या जागी युजवेंद्र चहलचा समावेश केला जाऊ शकतो. जलद गोलंदाजांमध्ये काही बदल होईल असे वाटत नाही. भुवनेश्वर कुमारसोबत प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांना कामय ठेवले जाईल. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fip0Rm
No comments:
Post a Comment