Ads

Saturday, March 27, 2021

हार्दिकला गोलंदाजी का दिली नाही; विराटच्या उत्तरावर भडकला सेहवाग

पुणे: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारतीय गोलंदाजांची धुलाई झाली. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने हार्दिक पंड्याला गोलंदाजी दिली नाही. विराटच्या या निर्णयावर माजी क्रिकेटपटू ()ने जोरदार टीका केली. दुसऱ्या वनडेत भारताचा ६ विकेटनी पराभव झाला. भारताने विजयासाठी दिलेले ३३७ धावांचे लक्ष्य इंग्लंडने ४४व्या षटकात पार केले. हार्दिकने टी-२० मलिकेत पाचवा गोलंदाज म्हणून गोलंदाजी केली होती. पण वनडे मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात त्याला चेंडू दिला गेला नाही. वाचा- विराटच्या या निर्णयावर अधिक टीका यासाठी झाली कारण इंग्लंडचे फलंदाज जॉनी बेयरस्टो आणि बेन स्टोक्स यांनी भारतीय फिरकीपटूंची जोरदार धुलाई केली. विराटकडे सहाव्या गोलंदाजाचा पर्याय होता. जो भारतीय संघासाठी फायद्याचा ठरला असतो. वाचा- सामना झाल्यानंतर विराटला याबद्दल विचारले असता. पुढील काही महिन्यात भारतीय संघाच्या मालिकेचा विचार करता हार्दिकला गोलंदाजी दिली गेली नाही. विराटच्या या उत्तरावर विरेंद्र सेहवागने नाराजी व्यक्त केली. क्रिकबझशी बोलताना तो म्हणाला, पुढील काही महिने भारतीय संघ कोणताही सामना खेळणार नाही. संपूर्ण सामन्यात फिल्डिंग करून थकवा जाणूव शकतो. अशा स्थितीत हार्दिक पंड्याला ३-४ ओव्हर दिल्या तरी फार फरक पडला नसता. वाचा- भारतीय संघ पुढील काही महिने क्रिकेट मालिका खेळणार नाही. वनडे मालिकेनंतर आयपीएल होणार आहे. आणि तुम्ही (विराट) तर म्हणत आहात की आम्ही मालिका गमावली तरी काही फरक पडत नाही कारण हार्दिक पंड्याचे वर्कलोड मॅनेज करायचे आहे. वर्कलोड मॅनेजमेंटमध्ये तो ४-५ ओव्हर गोलंदाजी करू शकत नसेल तर हे चुकीचे आहे. भारतीय संघाला प्रत्येक गोलंदाजाचे वर्कलोड मॅनेज करायचे आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की तो एकही ओव्हर गोलंदाजी करू शकत नाही. वाचा- शस्त्रक्रिया झाल्यानंतर हार्दिकवर अधिक लोड नाही. कदाचित हार्दिकला आयपीएल २०२१च्या आधी गोलंदाजीत ब्रेक घ्यायचा असेल. मला माहित नाही हे कोण ठरवते की हार्दिक पंड्यावर अधिक वर्कलोड आहे. शस्त्रक्रियेनंतर तो अधिक क्रिकेट खेळला नाही. तो कसोटी सामने खेळला नाही. पाच टी-२० मध्ये २-३ ओव्हर टाकल्या. तर त्याने आता लोड का घेतला नाही. असे देखील असू शकते की पंड्याला आयपीएलच्या आधी कोणतीही दुखापत करून घ्याची नसले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tXmNPp

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...