पुणे: इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या वनडे सामन्यात भारताने निसटता विजय मिळवला. विशेष म्हणजे इंग्लंडचे आघाडीचे पाच फलंदाज १५५ धावांवर आणि सात फलंदाज २०० धावांवर माघारी परतले असताना भारताला विजयासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. २२ वर्षीय सॅम करनने ८३ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह ९५ धावा केल्या. अखेरच्या १० षटकात भारतीय संघाला प्रचंड संघर्ष करावा लागला. भारतीय संघाची ही अवस्था पाहून अनेकांना माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी ()ची आठवण आली. वाचा- महेंद्र सिंह धोनी अशा प्रकारच्या सामन्यासाठी नेहमी तयार असायचा. त्याला माहिती असायची की कोणत्या खेळाडूकडून कधी गोलंदाजी करून घ्याची आहे. तसेच कोणत्या फलंदाजासाठी कशी फिल्डिंग लावायची आहे. याच बरोबर तो गोलंदाजाकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्यात एक्सपर्ट होतो. अशी अनेक उदाहरणे आहेत जेव्हा सामना भारताच्या हातातून निसटत चालला असताना धोनीने चतुराई दाखवली. धोनीचे सर्वात मोठे शस्त्र होते तो शांत रहायचा. वाचा- अटीतटीच्या लढतीत धोनी हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आणि कर्णधार मानला जातो. रविवारी ज्या पद्धतीने मॅच झाली, त्यामध्ये भारतीय संघाला इतका संघर्ष करताना पाहावे लागले. अनेक असे प्रसंग होते जेथे कर्णधार () अपयशी ठरला. उपकर्णधार रोहित शर्माकडून मदत मिळाल्यानंतर देखील सॅम करनच्या फलंदाजीवर तोडगा निघाला नाही. एक वेळ अशी होती की इंग्लंडचा डाव २५० च्या आत संपुष्ठात येईल, पण त्यांनी ३२२ धावा केल्या. वाचा- गोलंदाजांचा वापर या बाबत बोलायचे झाले तर भारताने या सामन्यात सहा गोलंदाज वापरले. ज्यातील तिघांनी विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूरने ४, भुवनेश्वर कुमारने ३ तर टी नटराजनने एक विकेट घेतली. प्रसिद्ध कृष्णा आणि क्रुणाल पंड्या यांना विकेट मिळवता आली नाही. ४० षटकात इंग्लंडने २६१ धावा केल्या होत्या. ६० चेंडूत त्यांना विजयासाठी ६९ धावा हव्या होत्या आणि आठ विकेट पडल्या होत्या. तळातील खेळाडू फलंदाजी करत असताना विराट कोहलीला स्वतंत्र रणनिती तयार करावी लागले. जेणेकरून भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही. सॅम करन आणि मार्क वुडने नवव्या विकेटसाठी ६१ चेंडूत ६० धावा केल्या. कर्णधार विराट कोहली वगळता रोहित शर्माला देखील नेतृत्व करावे लागले. रोहित प्रत्येक चेंडूनंतर गोलंदाजासोबत चर्चा करत होता. धोनीच्या बाबत असे प्रसंग कमी पाहायला मिळाले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2O15VrE
No comments:
Post a Comment