पुणे, : ट्वेन्टी-२० मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला आता भारताकडून एकदिवसीय संघात स्थान मिळणार का, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. पण सूर्यकुमारला यावेळी संघात स्थान मिळवणे सोपे नाही. कारण सूर्यकुमारला यावेळी सूर्यकुमारला यावेळी संघात स्थान मिळवण्यासाठी एका खेळाडूबरोबर स्पर्धा करावी लागणार आहे. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला असून त्याचे भारतीय संघातील चौथ स्थान रिक्त आहे. त्यासाठी सूर्यकुमारचा विचार केला जाऊ शकतो. कारण मधल्या फळीमध्ये सूर्यकुमार चांगली फलंदाजी करू शकतो. पण या स्थानासाठी सूर्यकुमारबरोबरच रिषभ पंतचेही नाव चर्चेत आहे. कारण यापूर्वी पंतने बऱ्याचदा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केलेली आहे. त्याचबरोबर सूर्यकुमारपेक्षा पंतला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव जास्त आहे. त्यामुळे सूर्यकुमारला भारताच्या एकदिवसीय संघात स्थान मिळवणे कठिण दिसत आहे. पण जर फॉर्मचा विचार केला तर सूर्यकुमारने चांगल्या धावा केल्या आहेत. त्यामुळे फॉर्मचा विचार केला तर पंतपेक्षा सूर्यकुमारला पसंती मिळू शकते. सूर्यकुमारसाठी असे मिळू शकते भारतीय संघात स्थान... सूर्यकुमारचा जर चौथ्या स्थानासाठी विचार केला नाही तर सलामीसाठी त्याचा विचार करण्यात येऊ शकतो. कारण सध्याच्या घडीला रोहित शर्मा हा दुखापतग्रस्त आहे. तो दुसऱ्या सामन्यात खेळेल, असे चिन्ह तरी सध्या दिसत नाही. त्यामुळे रोहित खेळणार नसेल तर शिखर धवनबरोबर सलामीला कोण येणार, हा प्रश्न भारतीय संघापुढे असू शकतो. त्यावेळी सूर्यकुमार हा संघासाठी एक चांगलचा पर्याय असू शकतो. कारण सूर्यकुमार आतापर्यंत तिसऱ्या स्थानावर खेळलेला आहे. त्यामुळे त्याला सलामीला पाठवण्याचा निर्णय भारतीय संघ यावेळी घेऊ शकतो. रोहित खेळणार नसेल तर धवनबरोबर सलामीला कोण येणार, याचा विचार भारतीय संघ करत आहे. पण त्यांच्याकडे आता बरेच पर्यायही उपलब्ध आहेत. कारण शुभमन गिल हा भारतीय संघात आहे आणि त्याने यापूर्वी भारतासाठी सलामी केली आहे. त्याचबरोबर लोकेश राहुलहादेखील भारतासाठी सलामीचा पर्याय असू शकतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Ps56bA
No comments:
Post a Comment