पुणे: भारत आणि इंग्लंड () यांच्यात आज (मंगळवार)पासून ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. पहिल्या वनडेच्या पूर्वसंध्येला भारताचा कर्णधार ( )ला विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्याने उत्तर गाण्यातून दिले. विराटच्या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ऑनलाइन पत्रकार परिषदेत विराटला केएल राहुल()च्या फॉर्मबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर विराट म्हणाला, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत ना जाए रैना... फॉर्म आणि आउट ऑफ फॉर्म यासाठी माझ्या डोक्यात एकच गोष्ट येते, असे म्हणत विराटने अमर-प्रेम या चित्रपटातील गाण्याच्या ओळी ऐकवल्या. वाचा- बाहेरच्या लोकांमध्ये संयम नसतो. क्रिकेट सेटअप च्या बाहेर लोकांचा एक दृष्टीकोन असतो. लोकांच्या डोक्या त हे सुरू असते की खेळाडूच्या डोक्यात काय सुरू आहे. ते अंदाज तयार करतात. लोकांना टीका ऐकण्याची आवड होत चालली आहे. एखादा खेळाडू खराब कामगिरी करत असेल तर लोकांना छान वाटते त्याला आणखी खाली आणण्याचा प्रयत्न करतात. संघात आम्हाला लक्षात येते की लोकांना कशा पद्धतीने हाताळायचे. कोहलीने हे देखील स्पष्ट केले की, संघ व्यवस्थापन खेळाडूंसोबत आहे. जर एखादा खेळाडू कठीण काळातून जात असेल तर असे नाही की तुम्ही क्रिकेट विसरून जा. फक्त थोडी स्पष्टता कमी होते. क्रिकेट एक साधा गेम आहे. तुम्हाला चेंडू बघायचा आहे आणि मारायचा आहे. तुम्हाला एका क्षणामध्ये जगावे लागते. वाचा- कोण कोणत्या हेतूने बोलतो, काय बोलतो. कशाचे वातावरण तयार केले जात आहे. या सर्व गोष्टी बाहेर झाल्या तरच चांगल्या आहेत. संघात अशा गोष्टी आम्ही येऊ देत नाही आणि येऊ देणार देखील नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vUrxqH
No comments:
Post a Comment