पुणे: भारताविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडेत इंग्लंडने धमाकेदार फलंदाजी केली आणि ६ विकेटनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघातील गोलंदाज ( )च्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेलाय. वाचा- प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने इंग्लंडपुढे विजयासाठी ३३७ धावांचे आव्हान ठेवले होते. इंग्लंडने हे लक्ष्य ४३.३ षटकात चार विकेटच्या बदल्यात पार केले. इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. या सामन्यात कुलदीप यादवने १० षटकात ८४ धावा दिल्या. त्याला एकही विकेट मिळाली नाही. कुलदीपने त्याच्या १० षटकात ८ षटकार दिले. भारतीय गोलंदाजांकडू एका वनडे सामन्यात देण्यात आलेले हे सर्वाधिक षटकार ठरले. वाचा- याबाबत कुलदीपने माजी जलद गोलंदाज विनय कुमारला मागे टाकले. विनय कुमारने २०१३ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७ षटकार दिले होते. बेन स्टोक्सने ३३व्या षटकात कुलदीपला सलग ३ षटकार मारत २० धावा दिल्या. कुलदीपला स्टोक्सने ४, जॉनी बेयरस्टोने ३ तर जेसन रॉयने १ षटकार मारला. वाचा- वाचा- इंग्लंडविरुद्धच्या कसोटी आणि टी-२० मालिकेत कुलदीपला संधी मिळाली नव्हती. पण वनडे मालिकेत अंतिम ११ मध्ये त्याला संधी मिळाली. पण दोन्ही वनडेत त्याला विकेट मिळवता आली नाही आणि त्याने धावा देखील भरपूर दिल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fhix9p
No comments:
Post a Comment