पुणे: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारताने प्रथम फलंदाजी करत सर्वबाद ३२९ धावा केल्या. भारतीय संघाला आणि यांनी या निर्णायक सामन्यात धमाकेदार सुरूवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १०३ धावा केल्या. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात शतकी भागिदारी करून रोहित आणि धवन यांनी एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १७व्यांदा शतकी भागिदारी केली. वाचा- क्रिकेटच्या इतिहासात वनडेमध्ये सर्वाधिक वेळा शतकी भागिदारी करण्याचा विक्रम आणि यांच्या नावावर आहे. या दोघांनी सलामीवीर म्हणून २१ वेळा शतकी भागिदारी केली आहे. वाचा- वनडेत सर्वाधिक वेळा शतकी भागिदारीचा विक्रम सचिन आणि गांगुली यांच्या नावावर आहे. या दोघांनी २६ वेळा अशी कामगिरी केली आहे. दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशान आणि कुमार संगकारा हे आहेत त्यांनी २० वेळी शतकी भागिदारी केली. तिसऱ्या क्रमांकावर रोहित आणि विराट कोहली आहेत, या दोघांनी १८ वेळा तर रोहित आणि धवन यांनी १७ वेळा शतकी भागिदारी केली आहे. वाचा- ... या सामन्यात रोहित आणि शिखर जोडीने वनडेत ५ हजार धावांची भागिदारी पूर्ण केली. सचिन आणि गांगुली यांच्यानंतर अशी कामगिरी करणारी ही भारताची दुसरी जोडी आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dcRV6D
No comments:
Post a Comment