
पुणे, : एकदिवसीय मालिकेबाबत इंग्लंडच्या एका माजी कर्णधाराने एक ट्विट केले होते. त्यामध्ये इंग्लंडचे महत्वाचे खेळाडू नसल्यामुळे भारतीय संघ ही मालिका सहजपणे जिंकेल, असे म्हटले होते. यावर भारताच्या एका माजी कर्णधाराने ट्विट करत इंग्लंडच्या कर्णधाराची बोलतीच बंद केली आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने एक ट्विट केले होते. त्यामध्ये वॉनने म्हटले होते की, "भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत जो रुट आणि जोफ्रा आर्चरसारखे इंग्लंडचे महत्वाचे खेळाडू खेळणार नाहीत. त्यामुळे ही मालिका भारतासाठी सोपी असेल. भारतीय संघाने ही मालिका ३-० अशी जिंकली तर आश्चर्य वाटायला नको." वॉनच्या या वक्तव्यावर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. आकाशने यावेळी वॉनच्या ट्विटला साजेसे उत्तर देत त्याची बोलतीच बंद करून टाकल्याचे पाहायला मिळाले. आकाशने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, " इंग्लंडकडे जर जो रुट आणि जोफ्रा आर्चर नसतील तर भारताकडे जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजासारखे मॅचविनर नाही आहेत." इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० आणि वनडे मालिकेत रवींद्र जडेजा हा दुखापतीमुळे खेळू शकला नाही, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा दुखापतीमधून सावरला असून त्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्याचबरोबर युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने आपल्या लग्नासाठी काही दिवसांची विश्रांती घेतली आहे. त्यामुळे हे तिन्ही महत्वाचे खेळाडू भारतीय संघाकडून खेळताना दिसत नाहीत. पण तरीही भारताच्या कोणत्या खेळाडूंनी याबाबत तक्रार केलेली नाही किंवा सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे जेव्हा इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉनने सहानुभूती मिळवण्याचा प्रत्न केला, तेव्हा त्याला भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने चांगलीच चपराक लगावल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता एकदिवसीय मालिकाचा निकाल काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कारण वॉनने भारतीय संघ ही मालिका ३-० अशी जिंकेल, असे भाकित वर्तवले आहे. त्यामुळे आता ही मालिका कोणता संघ जिंकतो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2OQYROX
No comments:
Post a Comment