पुणे: भारतीय संघाची मॅच सुरू आहे आणि संघाचा नंबर एकचा चाहता स्टेडियममध्ये उपस्थित नाही असे शक्यच होत नाही. भारतीय संघ जेव्हा जेव्हा मैदानावर उतरतो तेव्हा तेव्हा सुधीर गौतम त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रध्वजासह उपस्थित असतो. वाचा- भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा जबरा फॅन असलेला सुधीर काही दिवसांपूर्वी संपलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमधील सामन्यात सचिन आणि भारतीय संघाला पाठिंबा देताना दिसला होता. या मालिकेत भारताने अंतिम लढतीत श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपद मिळवले. त्यानंतर सुधीर थेट पुण्यात दाखल झाला. वाचा- पुण्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरी लढत काल (शुक्रवारी) झाली. पुण्यातील मालिकेत करोना व्हायरसमुळे स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे सुधीरला देखील मैदानात प्रवेश दिला गेला नाही. वाचा- मैदानात प्रवेश दिला नाही म्हणून सुधीरला भारतीय संघाला चिअर करण्यासाठी कोणी रोखू शकत नाही. त्याने मैदानाबाहेरून भारतीय संघाला प्रोत्साहन दिले. सुधीरने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमजवळच्या एका डोंगरावर जाऊन तेथून तिरंगा फडकावत भारतीय संघाचा चिअर केले. वाचा- मैदानाबाहेरून अशा पद्धतीने संघाला प्रोत्साहन देणाऱ्या सुधीरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामना सुरू असताना एका समालोचकाने सुधीरला इतक्या लांबून काही दिसत असेल का असा प्रश्न विचारला. त्यावर दुसऱ्या समालोचकाने उत्तर दिले. त्याला काही तरी दिसत असेलच.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/31uIREF
No comments:
Post a Comment