पुणे: भारत आणि इंग्लंड () यांच्यात मंगळवारी पुण्यात पहिला वनडे सामना झाला. भारताने या सामन्यात ६६ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. टीम इंडियाने शानदार कामगिरी करत विजय मिळवला असला तरी या सामन्यात भारताला दोन धक्के बसले. वाचा- भारतीय संघ फलंदाज करताना सलामीवीर रोहित शर्माला दुखापत झाली. त्यानंतर गोलंदाजी करताना एक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करताना श्रेयस अय्यर( )ला दुखापत झाली. श्रेयसच्या दुखापती संदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने दिलेल्या अपडेटनुसार तो इंग्लंडविरुद्धच्या उर्वरीत दोन वनडे सामन्यात खेळू शकणार नाही. वाचा- इंग्लंडच्या डावातील आठव्या षटकात शार्दुल ठाकूरला जॉनी बेयरस्टोने शॉट मारला. हा चेंडू अडवण्यासाठी श्रेयसने हवेत झेप घेतली. यामुळे इंग्लंडला चार ऐवजी फक्त दोन धावा मिळाल्या. पण श्रेयसच्या खांद्याला मार बसला. त्यानंतर सपोर्ट स्टाफच्या मदतीने तो मैदानाबाहेर गेला. दुखापत गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर श्रेयसला रुग्णालयात नेण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रेयसची दुखापत इतकी गंभीर आहे की तो ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १४व्या हंगामात कदाचीत खेळू शकणार नाही. श्रेयसला झालेल्या दुखापतीमधून बाहेर येण्यासाठी मोठा कालावधी लागू शकतो. दुखापतीतून बाहेर आल्यानंतर फिटनेस मिळवण्यासाठी त्याला रिहॅबमध्ये जावे लागले. श्रेयस आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व करतो. गेल्या वर्षी त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/399y87c
No comments:
Post a Comment