मुंबई: आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलने रविवारी १४व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केली. करोना व्हायरसचे रुग्ण वाढत असले तरी ही स्पर्धा या वर्षी भारतात होणार आहे. जवळ जवळ दोन वर्षांनी भारतात होत आहे. या हंगामाचे सर्व सामने अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या शहरत होणार आहेत. वाचा- मैदानावर सर्वाधिक सामने आयपीएल २०२१ची पहिली लढत ९ एप्रिल रोजी चेन्नईत होईल. ही लढत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. तर जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्लेऑफच्या लढती आणि ३० मे रोजी फायनल मॅच होणार आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघ चार मैदानावर सामने खेळतील. ५६ साखळी सामन्यातील प्रत्येकी १० सामने चेन्नई, कोलकाता, मुंबई आणि बेंगळूरू येथे होणार आहेत. तर अहमदाबाद आणि दिल्ली येथे प्रत्येकी ८ सामने होतील. या वर्षी होणाऱ्या आयपीएलचे सर्वात खास गोष्टी म्हणजे कोणताही संघ घरच्या मैदानावर एकही सामना खेळणार नाही. त्यामुळे सर्व संघांच्या लढती या न्यूट्रल ठिकाणी होतील. असे आहे IPL 2021 वेळापत्रक

from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eoQVih
No comments:
Post a Comment