पुणे: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघात एका नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. त्याच बरोबर गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममुळे चर्चेत असलेल्या केएल राहुलला देखील संधी दिली केली आहे. पहिल्या वनडेत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात सलामीची जोडी म्हणून रोहित शर्मा आणि शिखर धवन यांना ठेवण्यात आले आहे. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर फलंदाजीला येईल. वाचा- टी-२० सामन्यात अपयशी ठरलेल्या केएल राहुलला संघ व्यवस्थापनाने पुन्हा एकदा संधी दिली आहे. संघात ऋषभ पंतच्या ऐवजी राहुलला फलंदाज आणि विकेटकिपर म्हणून स्थान देण्यात आले आहे. वाचा- ... सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या फलंदाजीला येईल. तर क्रुणाल पंड्या सातव्या, शार्दुल ठाकूर आठव्या, बुवनेश्वर कुमार नवव्या, १०व्या तर कुलदीप यादव अखेरच्या स्थानावर फलंदाजी करेल. वाचा- या सामन्यात भारताकडून आणि प्रसिद्ध कृण्णा यांना प्रथमच संधी देण्यात आली आहे. हे दोघेही भारताकडून आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करतील. कृणालने याआधी टी-२० मध्ये भारताचे प्रतिनिधत्व केले आहे. आज तो वनडेत पदार्पण करत आहे. तर प्रसिद्ध कृष्णाची ही पहिली आंतरराष्ट्रीय मॅच आहे. असा आहे भारतीय संघ- रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा इंग्लंड संघात सॅम बिलिंग्स, टॉम करन आणि मोईन अली यांचा समावेश करण्यात आला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3f833Vc
No comments:
Post a Comment