पुणे, : इंग्लंडविरुद्धचा तिसरा सामना सुरु असतानाच भारताच्या हार्दिक पंड्याकडून एक मोठी चुक घडल्याचे पाहायला मिळाले. या चुकीनंतर भारताचा कर्णधार विराट कोहली चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. नेमकं घडलं तरी काय, पाहा...ही गोष्ट घडली ती पाचव्या षटकामध्ये. यावेळी भारताकडून पाचवे षटक भुवनेश्वर कुमार टाकत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ही गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर इंग्लंडच्या बेन स्टोक्सने यावेळी जोरडार फटका मारला. त्यावेळी नेमकं काय होईल, हे कोणालाच कळत नव्हते. पण काही क्षणातच हा चेंडू हार्दिक पंड्याच्या हातात विसावणार आणि भारतीय संघाला मोठे यश मिळणार, असे दिसत होते. कारण यावेळी हार्दिककडे हा सोपा झेल आला होता. त्यामुळे हार्दिक हा झेल पकडेल, असे वाटत होते. पण हार्दिकला यावेळी हा सोपा झेल पकडता आला नाही आणि बेन स्टोक्सला जीवदान मिळाले. त्यावेळी स्टोक्स हा १५ धावांवर खेळत होता. त्यावेळी विराट कोहली हा निराश झालेला दिसला. भारतीय संघाने इंग्लंडला दोन जोरदार धक्के दिले होते. कारण भारताने पहिल्याच षटकात जेसन रॉयला बाद केले होते. त्याचबरोबर जॉनी बेअरस्टोलाही तिसऱ्या षटकात भुवनेश्वरनेच बाद केले आणि इंग्लंडची २ बाद २८ अशी अवस्था केली होती. त्यावेळी भारतीय संघाकडे तिसरा बळी मिळवण्याची संधी चालून आली होती. त्यावेळी गोलंदाजीही यापूर्वी दोन विकेट्स मिळवणारा भुवनेश्वर कुमारच करत होता. पण हार्दिकमुळे भारताला ही संधी पटकावता आली नाही. त्यानंतर स्टोक्सने दमदार फलंदाजी केली. पण अखेर टी. नटराजनने स्टोक्सला बाद केले. यावेळी स्टोक्स ३५ धावांवर बाद झाला. जीवदानानंतर स्टोक्सने २० धावा वाढवल्या. कदाचित या गोष्टीचा फटका भारताला बसूही शकतो. कारण सामन्यांमध्ये प्रत्येक धाव ही महत्वाची असते. त्यामुळे आता हार्दिक पंड्याने दिलेले हे जीवदान भारतीय संघाला महाग पडते की नाही, हे सामना संपल्यावरच समजू शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3u618on
No comments:
Post a Comment