पुणे, : दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली निराश झाला होता. पण यावेळी कोहलीने पराभवाचे नेमके कारण काय ठरले, हेदेखील सांगितले. या पराभवानंतर मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. सामना संपल्यावर कोहीली म्हणाला की, " आम्ही चांगली फलंदाजी केली. इंग्लंडपुढे ठेवलेले ३३७ धावांचे आव्हान नक्कीच चांगले होते. नवीन चेंडूने आम्ही सुरुवातही चांगली केली. पण इंग्लंडच्या खेळाडूंकडून काही गोष्टी यावेळी पाहायला मिळाला आणि त्यामुळेच आमच्या हातून यावेळी सामना निसटल्याचे पाहायला मिळाले." कोहली पुढे म्हणाला की, " आम्ही सुरुवातीला चांगली गोलंदाजीही केली. पण इंग्लंडच्या फलंदाजांनी शतकी भागीदारी रचली. इंग्लंडने पहिल्या दोन्ही विकेट्ससाठी शंभरपेक्षा जास्त धावांच्या भागीदाऱ्या रचल्या आणि त्यामुळेच आमच्या हातून सामना निसटल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडच्या खेळाडूंनी यावेळी चांगली फलंदाजी केली, त्यामुळे या विजयाचे श्रेय त्यांना नक्कीच द्यायला हवे. कारण जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांनी चांगली भागीदारी रचली. यावेळी दवाचे प्रमाण जास्त वाटले नाही, पण खेळपट्टीची फलंदाजांना मदत मिळत होती. गेल्या सामन्यात आम्ही चांगली कामगिरी केली होती आणि सामना जिंकलो होतो, यावेळी इंग्लंडने आमच्यापेक्षा चांगली कामगिरी केली. त्यामुळेच त्यांना दुसऱ्या सामन्यात विजय मिळवता आला." मी शतकांसाठी खेळत नाही.... सामन्यानंतर विराट कोहलीला एक अवघड प्रश्न विचारण्यात आला. भारताचा माजी क्रिकेटपटू मुरली कार्तिकने यावेळी कोहलीला विचारले की, ' कोहली म्हणजे शतकांची खाण असल्याचे म्हटले जाते. पण गेल्या काही सामन्यांत कोहलीकडून शतक पाहायला मिळाले नाही.' या प्रश्नावर कोहली म्हणाला की, "मी शतकांसाठी कधीच खेळत नाही. माझ्यासाठी संघाचा विजय हाच महत्वाचा असतो. मी शतक झळकावले आणि संघाला विजय मिळवता आला नाही, तर ते मला आवडत नाही. पण मी शतक न झळकावताही संघ जिंकला, हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. त्यामुळे माझ्या शतकापेक्षा संघाचा विजय हा महत्वाचा आहे."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3d8z6BD
No comments:
Post a Comment