Ads

Friday, March 26, 2021

IND vs ENG : वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघ कशी उभारतोय मोठी धावसंख्या, जाणून घ्या महत्वाची गोष्ट...

पुणे, : ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेतील सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये भारतीय संघाकडून मोठ्या धावसंख्या होत नव्हत्या. पण दोन्ही वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभारली आहे. भारतीय संघाला ही गोष्ट जमली तरी कशी, पाहा... इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ३१७ धावा केल्या होत्या. या सामन्यात भारताची सुरुवात संथ झाली होती. पण तरीही या सामन्यात भारतीय संघाने ३०० धावांचा टप्पा सहजपणे गाठला होता. या गोष्टीचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अखेरची १० षटके. कारण पहिल्या सामन्यातील अखेरच्या १० षटकांमध्ये भारतीय संघाने ११२ धावा फटकावल्या होत्या, त्यामुळे भारतीय संघाला ३१७ धावांपर्यंत मजल मारती आली होती. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ३३६ धावांचा डोंगर उभारला. या सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली नाही. कारण गेल्या सामन्यात ९८ धावांची खेळी साकारणारा शखर धवन यावेळी फक्त चार धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मालाही २५ धावांवर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी भारताची २ बाद ३७ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतरही भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी दमदार खेळी साकारली. लोकेश राहुलने यावेळी शतक झळकावले, तर विराट कोहली आणि रिषभ पंत यांनी यावेळी अर्धशतक झळकावले. त्याचबरोबर अखेरच्या १० षटकांमध्ये भारतीय संघाने तब्बल १२६ धावा फटकावल्या आणि त्यामुळेच भारतीय संघाला ३३६ धावांचा डोंगर उभारता आला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sCSVaZ

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...