मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच विक्रमी जेतेपदे पटकावली आहे. आयपीएलमध्ये कोणत्याही संघाला किंवा कोणत्याही कर्णधाराला आतापर्यंत पाच जेतेपदे पटकावता आलेली नाहीत. पण यावर्षीच्या आयपीएलसाठी रोहित शर्माने नवीन प्लॅन आखला आहे. रोहितच्या प्लॅनचा व्हिडीओ सध्याच्या घडीला सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाल्यावर रोहित शर्मा म्हणाला की, " आतापर्यंत आयपीएलची पाच जेतेपदे आम्ही पटकावली आहेत. पण जिंकण्याची भुक आता वाढवायला हवी. लोभाबरोबर आता मैत्री करायला हवी. हाच आहे मोठा मंत्र..." रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळताना संघाला तब्बल पाचवेळा जेतेपद पटकावून दिले आहे, हा आयपीएलमधील एक विक्रमही आहे. आतापर्यंत कोणत्याही कर्णधारा रोहितचा हा विक्रम मोडता आलेला नाही. त्यामुळे आता रोहित सहाव्यांदा आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घालणार का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा सोमवारी मुंबईत दाखल झाला. इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका भारताने २-१ने जिंकली आणि भारताचा उपकर्णधार रोहित शर्माचे पुढील मिशन सुरू झाले. मुंबई इंडियन्सने आयपीएलची पाच विजेतेपद मिळवली आहेत. आता या वर्षी त्यांची नजर सलग तिसऱ्या विजेतेपदावर असेल. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एका गाडीतून रोहित शर्मा मुंबईत दाखल झाल्याचे दिसते. रोहित शर्मा बरोबरच भारतीय संघातील हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या आणि सूर्यकुमार यादव हे देखील मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाले. संघात दाखल झाल्यावर सूर्यकुमार काय म्हणाला की, " सध्याच्या घडीला मी सर्वात आनंदी आहे. कारण भारतीय संघाकडून खेळण्याचे माझे स्वप्न होते आणि आता ते साकार झाले आहे. भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. भारतीय संघाचे एक भाग होणे, ही माझ्यासाठी सुखावणारी गोष्ट आहे. पण आता भारतीय संघाची जबाबदारी संपलेली आहे आणि आता मी माझ्या कुटुंबामध्ये दाखल झालो आहे. मुंबई इंडियन्स हे माझ्या घरासारखेच आहे. आता पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी मी सज्ज झालो आहे."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fj4XlU
No comments:
Post a Comment