पुणे: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्याला सुरूवात झाली आहे. भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत ६६ धावांनी जिंकली होती. आता दुसऱ्या लढतीत विजय मिळवून भारतीय संघ मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. वाचा- दुसऱ्या वनडेत अनेक विक्रमांची संधी आहे. भारतीय संघाचा कर्णधार ( ) हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमा जवळ पोहोचला आहे. विराटच्या नावावर वनडेत भारतीय भूमीवर १९ शतक आहेत. तर सचिनने भारतात २० शतक केली आहेत. वाचा- विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय वनडेत तीन शतक केली आहेत. आणखी एक शतक करता तो युवराज सिंगच्या चार शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करेल. भारताकडून इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक चार शतक युवराजने केली आहेत. वाचा- भारतीय संघाचे इंग्लंडविरुद्ध मायदेशात शानदार रेकॉर्ड आहे. दोन्ही संघात झालेल्या गेल्या २२ लढतीपैकी १८ लढती भारताने जिंकल्या आहेत. तर एक लढत टाय झाली. गेल्या ६ सामन्यातील रेकॉर्ड पाहिले तर भारताने ५ मध्ये विजय मिळवला आहे. विराट कोहलीला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत फार प्रभाव टाकता आला नव्हता. पण त्यानंतर झालेल्या टी-२० मालिकेत विराटची बॅट तळपली आणि त्याने मालिकावीर पुरस्कार पटकावला. पहिल्या वनडेत देखील विराटने अर्धशतक झळकावले. आता सर्वांना प्रतिक्षा आहे ती त्याच्या शतकाची. आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये विराटला मोठ्या कालावधीपासून शतक करता आले नाही. विराटच्या नावावर एकूण ७० शतक आहेत. त्याने अखेरचे शतक ऑगस्ट २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झळकावले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lRk0EF
No comments:
Post a Comment