ख्राइस्टचर्च : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यावर सर्व भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आहे. पण जागतिक क्रिकेटमधील आणखी एका लढतीने सर्व चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. वाचा- बांगलादेशचा संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघात तिसरी वनडे आज झाली. या सामन्यात न्यूझीलंडने १६४ धावांनी विजय मिळवत मालिका ३-०ने जिंकली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत ३१८ धावा केल्या. यात डेरिल मिचेल आणि डेव्हन कॉनवे यांच्या शतकाचा समावेश होता. वाचा- न्यूझीलंड क्षेत्ररक्षण करत असताना जलद गोलंदाज ट्रेंट बोल्टने शानदार कॅच पकडला. या कॅचमुळे बोल्ट चर्चेत आला आहे. त्याने घेतलेल्या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. वाचा- बांगलादेशच्या डावातील सातव्या ओव्हरमध्ये मॅट हेन्नरीने टाकलेल्या गोलंदाजीवर दासने शॉट मारला. चेंडू हवेत थर्डमॅनच्या दिशेने गेला. तेथे उभ्या असलेल्या बोल्टपासून चेंडू थोडा लांब होता. पण त्याने हवेत उडी मारली आणि शानदार कॅच घेतला. चेंडू बोल्टच्या बोटांमध्ये असा काही स्थिर झाला की सर्वजण हैराण झाले. हा कॅच निट घेतला आहे का याबद्दल अनेकांना शंका होती. पण बोल्टने आउट असल्याचे सांगितले. बोल्टच्या या कॅचचे सोशल मीडियावर भरपूर कौतुक होत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3w0BPpf
No comments:
Post a Comment