Ads

Monday, March 22, 2021

कसोटी, टी-२० जिंकली आता वनडे मालिकेवर नजर; टीम इंडियाला द्यायचा आहे इंग्लंडला हा धक्का

पुणे: कसोटी आणि टी-२० मालिकेत पिछाडीवर असताना शानदार कमबॅक करत भारतीय संघाने विजय मिळवला. आता भारतीय संघासमोरचे आव्हान ५० षटकांच्या वनडे सामन्याचे असेल. भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून तीन सामन्यांची सुरू होणार आहे. कसोटी मालिकेत भारतीय संघ १-०ने पिछाडीवर होता. त्यानंतर ही मालिका भारताने ३-१ने जिंकली. नंतर टी-२० मालिकेत भारत २-१ने पिछाडीवर होता. तेव्हा देखील अखेरच्या दोन लढती जिंकून टीम इंडियाने मालिका जिंकला. आता वनडे मालिकेची सुरुवात विजयाने करण्याचा भारता प्रयत्न असेल. वाचा- भारतीय संघाने या मालिकेत ३-०ने विजय मिळवल्यास आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इंग्लंडला मागे टाकण्याची संधी आहे. इंग्लंडचा संघ १२३ गुणांसह वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. तर भारतीय संघ ११७ गुणांसह न्यूझीलंडसह दुसऱ्या स्थानावर आहे. जर भारताने वनडे मालिका ३-०ने जिंकली तर त्यांचे १२० गुण होतील आणि ते क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचतील. तर इंग्लंड ११९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरेल. वाचा- भारतीय संघातील सलामीवीर शिखर धवनसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. ३५ वर्षीय शिखरला अहमदाबाद येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात धावा करता आल्या नाही. त्यानंतर त्याला संघात स्थान मिळाले नाही. भारताकडून सलामीच्या जोडीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. संघात शुभमन गिल देखील आहे. तर पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल यांनी देखील सलामीच्या स्थानासाठी दावा केला आहे. अशा परिस्थितीत शिखरसाठी ही वनडे अग्निपरीक्षेसारखी असेल. शतकांचा दुष्काळ संपणार का भारतीय संघ या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपची तयारी करत आहे. वनडे मालिका ही फार मोठी नाही. त्यामुळे भारताच कर्णधार विराट कोहलीला वनडे मालिकेत मोठी खेळी करण्याची संधी आहे. टी-२० विराटने चांगली फलंदाजी केली होती. वनडे मालिकेच्या निमित्ताने विराटला शतकांचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे. विराटने ऑगस्ट २०१९ मध्ये ४३वे शतक झळकावले होते. अंतिम संघात कोणाला संधी पहिल्या वनडेत केएल राहुल आणि ऋषभ पंत या दोघांना संधी मिळण्याची शक्यता आहे. राहुलला मध्यळ्या फळीत फलंदाजीला उतरवले जाऊ शकेत. गेल्या वर्षी तो मधळ्याफळीत खेळला होता. पंतला विकेटकिपिंगसह हार्दिक पंड्यासह मधळ्याफळीतील फलंदाजीची जबाबदारी असेल. श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव या दोघांच्यात मोठी स्पर्धा असेल. वाचा- गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारच्या नेतृत्वाखाली अन्य खेळाडू असतील. शार्दुल ठाकूरला देखील संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर प्रसिद्ध कृष्णाला देखील संधी मिळू शकते. नंबर गेम एकूण सामने- १०० भारताचे विजय- ५३ इंग्लंड विजय- ४२ टाय- २ रद्द- ३ >> २०१० नंतर भारताने मायदेशात फक्त ३ द्विपक्षीय वनडे मालिका गमावल्या आहेत. >>२०१७ मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात पुण्यात अखेरची लढत झाली. तेव्हा भारताने ३५१ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. >>इंग्लंडविरुद्ध युवराज सिंगने सर्वाधिक ४ शतक केली आहे. दोन्ही संघातील कोणत्याही फलंदाजाकडून करण्यात आलेली ही सर्वाधिक शतक आहेत. ३ शतकासह विराट आणि जो रूट दुसऱ्या स्थानावर आहेत कसे असेल पिच पुण्यातील खेळपट्टी फलंदाजासाठी चांगली मानली जाते. येथे आतापर्यंत झालेल्या चार वनडे सामन्यात तीन वेळा संघांनी ३००च्या वर धावा केल्या आहेत. दिवसाचे तापमान ३५ डिग्री असेल. पण रात्री दव पडल्याने गोलंदाजसाठी त्रासदायक ठरू शकते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sjFxIE

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...