पुणे: इंग्लंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ३२९ धावा केल्या. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक ८८, शिखर धवनने ६७ तर हार्दिक पंड्याने ६४ धावा केल्या. वाचा- या सामन्यात भारतीय संघाला संपूर्ण ५० षटके फलंदाजी करता आली नाही. गोलंदाज ()ने अखेरच्या काही षटकात तुफान फलंदाजी केली. त्याने २१ चेंडूत ३० धावा केल्या. यात ३ षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. वाचा- शार्दुलने छोटी पण महत्त्वाची अशी धावसंख्या उभी करून संघाला ३००च्या पुढे नेले. त्याने इंग्लंडा ऑल राउंडर बेन स्टोकच्या गोलंदाजीवर मोठे शॉट मारले. सामन्यात शार्दुलने स्टोक्सला षटकार मारला. त्यानंतर शार्दुलच्या जवळ आला आणि त्याने बॅट पाहिली. वाचा- शार्दुलने मारलेल्या षटकाराचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी. वाचा- स्टोक्सला विश्वास बसला नाही की शार्दुलने त्याला अशा पद्धतीने षटकार मारला. शार्दुलने गोलंदाजीत देखील कमाल केली. त्याने मोक्याच्या क्षणी इंग्लंडच्या चार विकेट घेतल्या आणि भारताच्या विजयात महत्त्वाची भूमीका बजावली. भारतीय संघाने दिलेले ३३० धावांचे आव्हान पार करताना इंग्लंडचे ५ फलंदाज १५५ वर तर ७ फलंदाज २००च्या आत बाद झाले होते. तरी त्यांनी सॅम करनच्या नाबाद ९५ धावांच्या खेळीच्या जोरावर ३२२ धावांपर्यंत मजल मारली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PjQsDD
No comments:
Post a Comment