पुणे: वनडेमधील वर्ल्डकप विजेता इंग्लंडचा संघ सध्या अडचणीत सापडला आहे. भारत दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात दमदार सुरूवात करणाऱ्या इंग्लंडला त्यानंतर मात्र यश मिळवता आले नाही. कसोटी मालिका ३-१ने गमावल्यानंतर त्यांचा टी-२० मालिकेत देखील पराभव झाला. आता पहिली वनडे गमावल्यानंतर दुसऱ्या लढतीत इंग्लंडच्या संघासमोर मालिका गमावण्याचे संकट आहे. वाचा- ... दुसऱ्या सामन्याआधी कर्णधार इयान मॉर्गन आणि सॅम बिलिंग्स दुखापतीमुळे संघाबाहेर झाले आहेत. कर्णधार मॉर्गन संपूर्ण मालिकेतून बाहेर झालाय. त्याला फिल्डिंग करताना दुखापत झाली होती. मॉर्गनच्या गैरहजेरीत जोस बटलर संघाचे नेतृत्व करेल. भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेनंतर इंग्लंडसमोर बरेच प्रश्न तयार झाले आहेत. बटलर कर्णधारपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडेल का? पहिल्या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना आलेल्या अपयशानंतर आता प्रथम फलंदाजी करून लक्ष्य द्यावे का? आक्रमक फलंदाजी करावी की परिस्थितीनुसार फलंदाजी करावी? असे अनेक प्रश्न इंग्लंड समोर आहेत. एकूणच वर्ल्डकप विजेता इंग्लंड मोठ्या दबावात आहे. वाचा- ... इंग्लंडच्या विरुद्ध भारताची अवस्था आहे. दुखापतीनंतर देखील बेंच स्ट्रेंथ मजबूत असल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास अधिक आहे. पहिल्या लढतीत दुखापतीमुळे श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मा संघाबाहेर झाले आहेत. या दोघांच्या बदली सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांना स्थान मिळू शकते. पंत फलंदाज म्हणून संघात असेल तर विकेटकिपिंगची जबाबदारी केएल राहुलकडेच असेल. या शिवाय पहिल्या सामन्यात महाग ठरलेला कुलदीप यादवा संघाबाहेर बसावे लागू शकते. त्याच्या जागी युजवेंद्र चहलला संधी मिळू शकेत. त्याच बरोबर संघात होणारा आणखी एक बदल म्हणजे शार्दुल ठाकूरच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते. शार्दुल गेल्या काही सामन्यात सातत्याने खेळत आहे. म्हणून त्याला विश्रांती दिली जाऊ शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tSWCcA
No comments:
Post a Comment