
पुणे: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे लढतीत भारतीय संघाकडून दोन खेळाडूंनी पदार्पण केले. प्रसिद्ध कृष्णा आणि ऑलराउंडर क्रुणाल पंड्या या दोघांना सामना सुरू होण्याआधी पदार्पणावेळी दिली जाणारी वनडे कॅप दिली गेली. भारतीय संघाकडून पदार्पणाची कॅप मिळाल्यावर क्रुणाल पंड्या भावनिक झाला. त्याने आकाशात पाहून वडिलांना अभिवादन केले. काही दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. क्रुणाला त्याच्या छोटा भाऊ हार्दिक पंड्याने पदार्पणातील टोपी दिली. त्यानंतर भारतीय संघातील अन्य खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने त्याला शुभेच्छा दिल्या. क्रुणालने याआधी भारतीय संघाकडून टी-२० सामने खेळले आहेत. आता तो वनडे संघात देखील दाखल झाला. त्याने २०२० च्या आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीनंतर नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीत शानदार कामगिरी केली होती. त्याने विजय हजारे स्पर्धेतील ५ डावात ३८८ धावा केल्या होत्या. यात दोन शतक आणि दोन अर्धशतकाचा समावेश होता. भारताकडून क्रुणालने आतापर्यंत १८ टी-२० सामन्यात २६च्या सरासरीने १२१ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळतो. मुंबईकडून हार्दिक आणि क्रुणाल एकात्र खेळतात. आता ते भारतीय संघात देखील खेळताना दिसणार आहेत. क्रुणाल सोबत प्रसिद्ध कृष्णाने देखील भारताकडून वनडेत पदार्पण केले. तो आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळतो. त्याने देशांतर्गत स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहेय २०१७-१८च्या विजय हजारे स्पर्धेत १७ विकेट घेतल्या होत्या. त्याने २०१९-२० मध्ये देखील त्याने १७ विकेट घेतल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cXL2pL
No comments:
Post a Comment