पुणे, : भारताचा कर्णधार विराट कोहलीवर आता गंभीर आरोप लावण्यात आलेला आहे. मैदानात सामना सुरु अताना विराट ज्या काही गोष्टी करतो, त्यावरुन हा आरोप लावण्यात आलेला आहे. इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉइड यांनी यावेळी विराटवर गंभीर आरोप लावला आहे. ते म्हणाले की, " मी यापूर्वीही सांगितले आहे की, विराटची मैदानातील वागणूक योग्य नसते. विराट ज्यापद्धतीने मैदानात पंचांशी वागतो ते अपमानजनक आहे. त्याचबरोबर विराटला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तो पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतो." डेव्हिड यांनी पुढे सांगितले की, " विराट जे काही मैदानात करतो त्याबद्दल तो विचार करत नसल्याचे पाहायला मिळते. त्याचबरोबर विराट जे बोलतो त्यालाही काही अर्थ असल्याचे दिसत नाही. विराटने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, जर चेंडू स्टम्पला लागत असेल तर खेळाडूला बाद देण्यात यावे. चेंडू किती टक्के स्टम्पला लागतो, हे त्यासाठी पाहण्यात येऊ नये. जर असे करण्यात आले तर कसोटी क्रिकेट फक्त दोन दिवसांत संपेल, तर एकदिवसीय सामना चार तासांमध्ये आटोपला जाऊ शकतो. या गोष्टींमुळे क्रिकेटमधली मजा राहणार नाही. त्याचबरोबर जे गोलंदाज स्टम्पच्या दिशेने गोलंदाजी करतात ते आठ-आठ विकेट्स मिळवतील. त्यामुळे मला तरी वाटते की, पंचांच्या निर्णयाचा आदर करायला हवा." विराट हा मैदानात आक्रमक असल्याचे पाहायला मिळते. त्याचबरोबर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराटचा मैदानातील पंचांबरोबर वाद झाला होता. त्यावेळी आयसीसीने कोहलीवर कारवाई केली होती आणि त्याला दोन डिमेरीट गुणही दिले होते. त्याचबरोबर चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यात जेव्हा सूर्यकुमार यादव बाद झाला तेव्हाही कोहली भडकलेला पाहायला मिळाला होता. त्यावेळीही कोहली मैदानात पंचांशी हुज्जत घालत असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे कोहली जर अशाच गोष्टी करत राहीला तर आयसीसी त्याच्यावर कडक कारवाई करू शकते. त्यामुळे मैदानात पंचांशी किंवा खेळाडूंशी वागताना कोहलीने संयम दाखवायला हवा आणि त्यांचा आदर करायला हवा.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/31bSfx9
No comments:
Post a Comment