पुणे : भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला. भारताने पहिल्या वनडेत ६६ धावांनी विजय मिळून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताने विजयासाठी दिलेले ३१८ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना इंग्लंडने दमदार सुरूवात केली होती. पण त्यानंतर त्यांचा डाव कोसळला. आता दुसऱ्या वनडे आधी इंग्लंडला दोन धक्के बसले आहेत. वाचा- भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाने कसोटी आणि टी-२० मालिका गमावली आहे. आता वनडे मालिका जिंकून किमान दौऱ्यातील एक तरी मालिका विजय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पहिली लढत गमावल्यामुळे इंग्लंडला उर्वरीत दोन लढतीत विजय मिळवावा लागले. अशात दुसऱ्या वनडे आधी त्यांना मोठा धक्का बसला आहे. वाचा- इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन()च्या डाव्या हाताच्या अंगठ्याला आणि बोटाला दुखापत झाली आहे. ही दुखापत इतकी गंभीर आहे की त्याला चार टाके लावावे लागले. तर संघातील आणखी एक फलंदाज सॅम बिलिंग्स()ला देखील फिल्डिंग करताना दुखपत झाली. त्याच्या दुखापतीवर बोलताना मॉर्गन म्हणाला, आमच्यासाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे आहेत. आम्ही वाट पाहू आणि पाहू कसे काय होते. शुक्रवारपर्यंत तो उपलब्ध होईल अशी आशा आहे. वाचा- सॅमच्या दुखापतीनंतर मॉर्गनने स्वत:च्या दुखापतीबद्दल सांगितले. असे नाही की मला बॅट पकडता येत नाही. मी १०० टक्के आता काहीच सांगू शकत नाही. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lKB3bg
No comments:
Post a Comment