पुणे: भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या वनडेत पुन्हा एकदा खराब अंपायरिंग पाहायला मिळाली. भारताने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर विजयासाठी ३३७ धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य इंग्लंडने ४४व्या षटकात पार केले. वाचा- इंग्लंडच्या डावात ज्या फलंदाजाने मॅच फिरवली त्या संदर्भात एक मोठा वाद झाला. बेन स्टोक्स धावबाद होता. पण खराब अंपायरिंगमुळे त्याला जीवनदान मिळाले. त्याने ५२ चेंडूत ९९ धावा केल्या. वाचा- सामन्यातील २६व्या डावात भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर स्टोक्सने मिड विकेटच्या दिशेने शॉर्ट खेळला. त्याने पहिली धाव वेगाने घेतली आणि दुसरी घेण्यासाठी तो धावला. मिड विकेटवर फिल्डिंग करणाऱ्या कुलदीप यादवने चेंडू विकेटकिपर ऋषभ पंतच्या दिशेने थ्रो केला. वाचा- दुसरी धाव घेताना स्टोक्सचा वेग कमी होता. तो क्रीझ मध्ये पोहोचेपर्यंत चेंडू विकेटला लागला होता. भारताने जोरदार अपिल केली. मैदानावरील अंपायरने तिसऱ्या अंपायरकडे निर्णय सोपवला. टीव्ही रिप्लेमध्ये स्टोक्सची बॅट क्रीझच्या आत नव्हती. अनेक वेळा पाहिल्यानंतर तिसऱ्या अंपायरने स्टोक्सला नाबाद दिले. वाचा- यावर पिचवर आला आणि अंपायर यांना समजावण्याचा प्रयत्न करू लागला. पण मेनन यांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. मेनन यांना समजावण्यासाठी विराट चक्क पिचवर बसल आणि त्यांना गोष्टी पटवण्याचा प्रयत्न करत होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बेन स्टोक्स १०० टक्के आउट होता. समालोचक आकाश चोप्रा आणि इरफान पठाण देखील या गोष्टीशी सहमत होते. पण तिसऱ्या अंपायरच्या निर्णयानंतर कोणी काहीच करू शकत नाही. वाचा- बेन स्टोक्सच्या या धावबादवर सोशल मीडियावर अनेक जण प्रतिक्रिया देत आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने देखील मी असतो तर आउट दिले असते,असे म्हटले आहे. युवराज सिंग
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cprxYe
No comments:
Post a Comment