Ads

Tuesday, March 30, 2021

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील भांडण कोणी मिटवलं, पाहा ही व्यक्ती आहे तरी कोण...

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यामध्ये मतभेद असल्याचे वृत्त बऱ्याचदा प्रसारमाध्यमांमध्ये आले होते. त्याचबरोबर गेल्यावर्षी झालेल्या आयपीएलनंतर जेव्हा रोहितीची निवड ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी करण्यात आली नव्हती तेव्हा त्याचे विराटबरोबर काही तरी बिनसले असल्याची चर्चा होती. पण आता विराट आणि रोहित यांच्यामधील भांडण मिटले आहे. एका खास व्यक्तीने रोहित आणि विराट यांच्यामधील भांडण मिटवल्याचे आता समोरही आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, विराट आणि रोहित एकमेकांबरोबरचे मतभेद दूर करण्यासाठी एका टेबलवर बसले होते. विराट आणि रोहित यांच्यामधील मतभेद मिटवण्याचे श्रेय यावेळी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना जाते. कारण यासाठी रवी शास्त्री यांनी जोरदार प्रयत्न केले आहेत. यावेळी या दोघांनीही आपले मुद्दे मांडले. बायो-बबलमुळे खेळाडूंच्या मानसीकतेवर परीणाम होत असल्याचे बोलले जात असले, तरी शास्त्री यांनी मात्र विराट आणि रोहित यांच्यातील मतभेद दूर केले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाला त्यांच्या सूत्रांनी सांगितले की, " गेल्या काही महिन्यांपूर्वी भारतीय संघातील वातावरण चांगले नव्हते. खेळाडूंमधील संबंध चांगले नव्हते. संघातील खेळाडूंमध्ये असलेल्या कटुपणाचा फायदा अन्य लोकं उचलतात आणि संघाचे मोठे नुकसान होते. त्यामुळे संघातील खेळाडूंनी कसे एकत्रपणे राहावे आणि कसा एकमेकांच्या मताचा आदर करावा, हे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर विराट आणि रोहित यांच्यातील मतभेद दूर झाल्याचे पाहायला मिळाले." आतापर्यंत बऱ्याचवेळी विराट आणि रोहित यांची मत भिन्न असल्याचे पाहायला मिळते. २०१९ साली झालेल्या विश्वचषकानंतरही रोहित नाराज झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्याचबरोबर आयपीएलनंतर तर या दोघांमध्ये विस्तवही जात नसल्याचे म्हटले जात होते. पण या सर्व गोष्टींमुळे संघ दिशाहीन होतो आणि त्यामुळे भरपूर नुकसान होते. त्यामुळे एखाद्या खेळाडूच्या हितापेक्षा संघ नक्कीच महत्वाचा आहे. त्यामुळे विराट आणि रोहित यांच्यामधील मतभेद काही दिवसांपूर्वी मिटल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये विराट रोहितचा सल्ला घेत असल्याचेही पाहायला मिळाले होते. त्यामुळे आता विराट आणि कोहली यांच्यातील मतभेद मिटल्याचेच दिसत आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PKi5G0

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...