मुंबई : दिल्ली कॅपिटल्सला आता रिषभ पंतच्या रुपात नवीन कर्णधार मिळाला आहे. पण कर्णधारपद स्विकारल्यावर आता पंत हा रजनीकांत यांच्याकडून ट्रेनिंग घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. पंत आणि रजनीकांत यांचा व्हिडीओ सध्याच्या घडीला व्हायरल झाला आहे. पंतने आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पंत हा व्यायाम करत असताना दिसत आहे. या व्हिडीओखाली पंतने लिहिले आहे की, " तुम्हाला स्वत:ला फिट ठेवायचे असेल तर प्रत्येक दिवशी व्यायाम करावा लागतो. आयपीएलच्या नव्या हंगामासाठी आता मी सज्ज झालो आहे. स्ट्रेंथ आणि कंडीशनिंग कोच रजनीकांत यांच्याबरोबर मी काही व्यायामप्रकार केले आहेत. या सेशनचा नक्कीच मला फायदा होईल. दिल्ली कॅपिटल्सची जर्सी घालून मैदानात उतरण्यासाठी मी आतूर झालो आहे." श्रेयस अय्यरला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तो आता आयपीएल खेळू शकणार नाही. दिल्लीच्या संघाने कर्णधारपदी आता यष्टीरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज रिषभ पंतची निवड केली आहे. आतापर्यंत पंतने दिल्लीच्या संघाचे कर्णधारपद भुषवले नव्हते. पण आता श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये खेळणार नसल्यामुळे त्याच्या जागी पंत हा दिल्लीचे कर्णधारपद सांभाळणार आहे. दिल्लीच्या कर्णधारपदासाठी अजिंक्य, पृथ्वी. स्टीव्हन स्मिथ, आर. अश्विन आणि पंत यांच्यांमध्ये स्पर्धा असल्याचे पाहायला मिळाले होते. पण दिल्लीच्या संघाने यावेळी पंतच्या नावावर कर्णधार म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. पंत हा दिल्लीचा असून त्याचा फायदा संघाला होईल, असे वाटत आहे. त्यामुळेच पंतकडे यावेळी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या संघाने गेल्या आयपीएलमध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पण त्यांना जेतेपद पटकावता आले नव्हते. अंतिम फेरीत दिल्लीला मुंबई इंडियन्सच्या संघाकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आता पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ कितपत मजल मारतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्यामुळे आता पंतची जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे कर्णधारपद मिळाल्यावर पंतच्या बॅटमधून किती धावा निघतात, हे पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39v3g0X
No comments:
Post a Comment